
अबोदनगो सुभाष चव्हाण…
जिल्हा प्रतिनिधी अमरावती…
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटूंब कल्याण मंत्री ना.श्री.प्रकाश आबिटकर हे मेळघाटात दौऱ्यात असतांना काटकुंभ येथे चिखलदरा शिवसेना तालुका प्रमुख निलेश मालविय यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मेळघाटचे आमदार श्री.केवलरामजी काळे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.गोपाल पाटिल अरबट,उपजिल्हाप्रमुख भुषण नागे,युवा स्वाभिमानचे श्री.उपेन बछले,कामगार सेना जिल्हा प्रमुख सुभाष घुटे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य समिती सदस्या सौ.सोनाली ताई देशमुख,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री महोदयांचे आगमन होताच शिवसैनिकांच्या वतीने व मालविय परीवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश मालविय यांनी भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा ना.प्रकाश आबिटकर यांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
नामदार प्रकाश आबिटकर यांनी मेळघाटातील अतिदुर्गम भागात दौऱ्या केल्यामुळे मेळघाटातील जनतेमध्ये व शिवसैनिकांमध्ये यावेळी आनंदाचे वातावरण होते.
या वेळी युवा सेना तालुका प्रमुख राकेश झारखंडे,शिवसेना सर्कल प्रमुख घनश्याम अथोटे,भावेश राठौर,प्रितेश साठे,विजय राठौर, असंख्य शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.