
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या कार्यकाळात वाळू आणि मूरुन खनिज संपदेची सर्रास लुट केली आहे आणि सुरु आहे.असे असताना स्वतःला सक्षम समजणारे आमदार वाळू सारख्या खनिज संपदेची सर्रास लुट होत असताना चूप राहतात याला काय म्हणायचे?
सक्षम व्यक्तीमत्व,योग्य कर्तव्य की लोक सेवे अंतर्गत जाणिवपूर्वक गाफीलपणा हे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनीच चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना समजावून सांगितलेले बरे…
चिमूर तालुक्यातील,”हायवा द्वारे, दररोज वाळू पर जिल्ह्यात नेली जात आहे,वाळू चोरुन नेणाऱ्यांकडे स्थानिक जबाबदार अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत.
याचा अर्थ असा आहे की चिमूर तालुक्यातील परजिल्ह्यात दररोज नेली जाणारी वाळू स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि सदर हायवा कुणाचे आहेत हे सुद्धा त्यांना माहिती आहे.तद्वतच वाळू चोर कोण आहेत हे सुद्धा स्थानिक जबाबदार अधिकाऱ्यांना माहिती आहे असे एकंदरीत दिसून येते आहे.
चिमूर तालुक्यातील सर्रास वाळू चोरी करणाऱ्या चोरांना स्थानिक अधिकारी उत्तम कर्तव्य पार न पाडता चूप राहून साथ देत असतील तर ते सुद्धा वाळू चोरांचे साथीदार आहेत असे तालुक्यातील जनता म्हणारच!.
स्थानिक वाळू चोरांना पकडून त्यांच्याकडून विना कारवाईने भरमसाठ रुपये वसूल केले जात असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.हि चर्चा सत्य असेल तर परजिल्ह्यात दररोज नेली जात असलेल्या वाळू चोरांकडून किती रक्कम वसूली केली जाते,हे सुद्धा चिमूर तालुक्यातील नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे.
अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि कर्मचारी चिमूरात सुरक्षित ठेवले जात असतील तर हे कुठले शासन आणि प्रशासन?