
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- पंचायत समिती पारशिवनी येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक माहिती व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आज दि.24/3/2025 रोज सोमवार ला पंचायत समिती पारशिवनी सभागृहात करण्यात आले होते.
प.स.चे गटविकास अधिकारी श्री.सुभाष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका आरोग्य अधिकारी श्री.डॉक्टर नागपूरकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडली.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.जितेंद्र अंनकर विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी पंचायत श्री.यशवंत लिखाण व प्रशांत वाघ सर्व वैद्यकीय अधिकारी,सर्व ग्रामपंचायत अधिकारी,आरोग्य पर्यवेक्षक,जलसुरक्षक,आरोग्य सेवक, तसेच गट संसाधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.सदर प्रशिक्षण कार्यशाळेत पाणी गुणवत्ता चांगली राहण्याकरीता सविस्तर मार्गदर्शन केले.
मानवी जीवनात स्वच्छ व शुद्ध पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे.शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा नियमितपणे मिळावे तसेच पाण्याची गुणवत्ता चांगली असणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
शुद्ध,सुरक्षित व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे.योजनेतील दोष दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे,ब्लिचिंग पावडर (टी. सी. एल.) द्वारे पाणी निर्जंतुकीकरण करणे,ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याआधी त्याचे गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतून करणे,ओ.टी.टेस्ट नियमित घेणे व नकारात्मक आल्यास ब्लिचिंग पावडर चा वापर योग्यरीत्या करणे इत्यादी विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन श्री. मनेश दुपारे यांनी केले तर प्रस्तावना श्री.कुबडे आरोग्य पर्यवेक्षक यांनी केले,कार्यक्रमातंर्गत आभार प्रदर्शन प्रणय गजभिये यांनी केले.