
कमलसिंग यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी तालुका अंतर्गत मौजा पालोरा येथे श्री.महंतेश्वर महोत्सवांतर्गत श्री.राम कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहात श्री.महंतेश्वर महोत्सव समिती पालोराच्या पटागणात,”रिआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आकाशझेप फाऊंडेशन व लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने रविवार २३ मार्चला ऐच्छिक रक्तदान व निःशुल्क आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर घेण्यात आले.
याप्रसंगी रिआन हॉस्पिटल तर्फे रुग्णांची सामान्य तपासणी,ब्लड प्रेशर,शुगर तपासणी व औषधी वितरण करण्यात आले.
रिआन हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रदीप बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.श्वेता मोहोड,सिस्टर मेघा फुटाणे,अपूर्वा डहारे,विपीन बनसोड,मोनू गजभिये यांनी वैद्यकीय सेवा दिली.
आकाशझेप फाउंडेशनचे संस्थापक सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी ‘रक्तदान जीवनदान’ या विषयावर मार्गदर्शन केले.
लाइफ लाईन रक्तपेढी नागपूर तर्फे बीटीओ डॉ.अपर्णा सागरे आणि वैद्यकीय चमूने उत्तमरित्या रक्त संकलन केले. गावातील ९७ आबालवृद्धांनी शिबिरातील निःशुल्क सेवेचा लाभ घेतला. परिसरातील २५ व्यक्तींनी ऐच्छिक रक्तदान करून सामाजिक समता व राष्ट्रीय एकात्मतेचा कृतीशील संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच कुणाल कामडे,अतुल कुहीटे,लोकेश वाळके,योगेश मेश्राम,मयुर मनगटे,पंकज वाळके,प्रकाश चटप,प्रशांत टेकाम,रुपेश कामडे,अमोल कामडे, प्रशांत कोल्हे,चेतन कामडे,विनायक कामडे, आकाश राऊत, आदित्य वाळके,राहूल जळीतकर,नैतराम जळीतकर,पंकज कुहीटे,प्रमोद कुहीटे यांनी मोलाचे योगदान दिले.