महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शांती मार्च… — भारतीय बौद्ध महासभा तालूका पारशिवनी यांचा नेतृत्वात रमाई बौद्ध विहार आंबेडकर नगर येथुन निघाला शांतिमार्च…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी :- महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शांती मार्च – भारतीय बौद्ध महासभा तालूका पारशिवनी यांचा नेतृत्वात रमाई बौद्ध विहार आंबेडकर नगर येथून काढण्यात आला.

      भंते शिलरक्षित महतथैरो यांनी बौद्ध उपासक व उपासिका यांना त्रिशरण पंचशिल दिली.यानंतर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेश माल्यार्पन करण्यात आले.

            लागलिच छत्रपती शिवाजी महाराज चौक,येथुन गगनभेदी नाऱ्या सह शांति मार्चने क्रम केला व शिवाजी चौक,गांधी चौक,मुख्य बाजार चौक,या मार्गाने मार्च तहसील कार्यालय येथे पोहोचला.

         शांती मार्च मध्ये सहभागी झालेल्यांच्या हातात पंचशील ध्वज होते तर डोक्यावर निळ्या टोप्या होत्या.शांती मार्चमध्ये सहभागी झालेल्या बांधवांनी आणि भगिनींनी अंगावर वापरलेलं पांढरे शुभ्र वस्त्र आकर्षक होते.

       बौद्ध अनुयायी प्रचंड घोषणा देत शांती मार्च मध्ये सहभागी झाले होते.या मोर्च्या मध्ये तालुक्यातंर्गत ग्रामीण व शहर भागातील आंबेडकरी अनुयायी,उपासक-उपासिका सहभागी झाले होते.

            बुद्धगया येथील महाबोधी महाविराचे व्यवस्थापन बौद्धाच्या हाथी देण्यात यावे यासाठी पारशिवनी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार सुभाष वाघचौर व पोलिस निरिक्षक राजेशकुमार थोरात मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.

       बौद्धगया हे जगातील बौद्धाचे महत्वाचे स्थान आहे,जगातील लाखो पर्यटक हे बौधगया येथे भेटी देत असतात.मात्र या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौधच्या ताब्यात नाही,महाविहार हे बौधच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 1890 पासून आंदोलन होत आहे.महाबोधी महाविहार हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून सन १९४९ चा बौधगया महाविहार संबंधाने अन्ययकारक कायदा रद्द करावा,महाविहारचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धाना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे,महाविराच्या विकासासाठी विकासनिधी देण्यात याव्या या मागिकारिता शांती मार्च मोर्चा काढण्यात आला.

             यावेळी शांतिमार्च भारतिय बौद्ध महासभा नागपुर जिल्हा पुर्व संस्कार उपाध्यक्ष व बौद्धाचार्य पुनादास गजभिये,बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा प्रवक्ता कल्याण अड़कणे,नरेंद भिमटे,अशोक गणवीर,हर्षद गजभिये,हरिदास लांजेवर,रणजित रंगारी,ज्ञानदेव लोखंडे,पुनदास गजभिये चेतन सोमकुवर,बंटी बोरकर, ग्रा.पं.सदस्य सचिन सोमकुवर,तेजराम नारनावरे,दिगांबर खुबालकर,अंकित पाटील,पंकज वानखेडे,सचिन वाघमारे,सुदेश मेश्राम,लीलाबाई लांजेवार,लीला दुपारे,करुणा लांजेवार,कांचन बोरकर,रत्नमाला अंबादे,हर्षद गजभिये माया नारनवरे,जिवलग चव्हाण,अमित मेश्राम, तालुक्यातील बौद्ध उपासक उपस्थित होते.

        शेवटी शांतीमार्च चे रमाई बौद्ध विहार येथे समापन करण्यात आले श.बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभा पुनादास गजभिये यांनी शांती मार्च येथे सहभागी झालेल्या सर्वाचे आभार मानले.