युरोप मधील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी दिनेश गुंड यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : इस्टोनिया कुस्ती संघटनेच्या वतीने टॅल्लिन (इस्टोनिया) युरोप येथे दिनांक 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान होणाऱ्या जागतिक स्तरावरील आंतरक्लब कुस्ती स्पर्धेसाठी इस्टोनिया कुस्ती संघटनेच्या वतीने प्रा.दिनेश गुंड यांची तांत्रिक अधिकारी (पंच ) म्हणून निवड करण्यात आली आहे.

         आंतरराष्ट्रीय स्तरावर तांत्रिक अधिकारी म्हणून निवड होण्याची ही त्यांची 63 वी वेळ आहे. जागतिक कुस्ती संघटनेचे प्रा.दिनेश गुंड हे प्रथम श्रेणीचे पंच असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली 20 वर्षात त्यांनी आपल्या कामगिरीचा विक्रम नोंदविला आहे.

         सन 2003 पासून आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा प्रमुख, निवड समिती प्रमुख, पंचाना प्रशिक्षण देणे या कामामध्ये त्यांचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील योगदान खूप मोलाचे आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.