प्रत्येक जाती – धर्माच्या समाजातील ( समंजस ) युवापिढीने आता येथील व्यवस्थेचे डोळसतेने समीक्षण करुन स्वतासाठी, देशासाठी आक्रमक आणि क्रांतिकारी व परिणामकारक पाऊले उचलावीत……..

     “प्रत्येक देशातील नागरिकांने प्रथम आत्मपरीक्षण करुन समाजपरीक्षण करावे.”

     सॉक्रेटीस ( ग्रीक तत्वज्ञ )

    वरील तत्वज्ञानाचा अर्थ काय,,…?

      तर प्रत्येक नागरिकाने स्वतःला ओळखलं पाहिजे. मी कोण आहे, माझे नैतिक हक्क आणि कर्तव्य कोणते आहेत. माझ्या वयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात सुख कसे प्राप्त करुन घेता येईल. अशा माझ्या सुखी होण्याबरोबर इतर प्रत्येकजण माझ्यासारखाच सुखी झाला पाहिजे. त्यासाठी देशातून दुःख हद्दपार झाले पाहिजे. त्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करण्याची जागृती आणि कृती करण्याची तत्परता म्हणजे आत्मपरीक्षण होय. अशा प्रकारे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलेच पाहिजे.

         त्याचप्रमाणे हे आत्मपरीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या प्रत्येक नागरिकाने “समाजपरीक्षण ” केलेच पाहिजे. समाजपरीक्षण म्हणजे आपल्या, समाजावर ( प्रत्येक भारतीय नागरिकांच्या समूहावर म्हणजे समाजावर ) जी व्यवस्था राज्य करते, ती जर निसर्गनियमांवर आधारित असलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संविधाननिक, मूल्यांना अविष्कारीत न करता कोणत्यातरी कुटनीतीच्या बळावर आमच्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अज्ञानाचा लाभ उठवत असेल. आणि आम्हाला (भारतीय समाजाला ) जगता – जगता मरण्याच्या व मरता – मरता जगण्याच्या दयनीय अवस्थेत पिढ्यान पिढ्या ढकलून देत असेल. तर त्या व्यवस्थेला व्यवस्थितपणे समाजातील समंजस युवापिढीने या व्यवस्थेचा अभ्यास करुन, स्वतः पुढाकार घेऊन समाज जागृती करुन त्यांच्यासोबत कृतीतून सिद्ध होणे म्हणजे…….

         “समाजपरीक्षण”होय…..

       अशा समजनिर्मितीची आज नितांत आवश्यकता या देशाला आणि तेवढीच निकड या पुरोगामी महाराष्ट्राला आहे…..

            कारण…….!

     या देशात आणि राज्यात कुटनीतीवर आधारलेल्या असलेल्या नालायक आणि नितिभ्रष्ट राजकारण्यांनी अर्थात व्यवस्थेने लोकशाही, संविधान, मानवता 2025 च्या काळात धुळीस मिळवली…….

     यांच्यासोबतच येथील भ्रष्टाचारी सनदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले हात भ्रष्टाचाराच्या वाहत्या गंगेत धुवून घेतले.

         कोणताही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, पं. स. सभापती, जि. प. सदस्य, जि. प. सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, न्यायाधीश, न्यायमूर्ती, सरन्यायाधीश या सर्व आजी आणि माजी संविधानिक जबाबदार पदाधिकारी यांनी आमच्यातील (भारतीय समाजातील ) अज्ञानातून निर्माण झालेल्या कोरड्या जाती – धर्मातून आलेल्या अहंकाराला खतपाणी घालून आम्हाला गेल्या 75 वर्षांपासून दुःखात लोटले आहे……..!

     परिणामी आम्ही आज 2025 च्या काळात जगता – जगता मरत आहोत आणि मरता – मरता जगत आहोत. हे वास्तव आहे ( जरी आम्ही भौतिक सुखात असल्याचा भास होत असला तरी प्रत्येकाने स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीला प्रश्न विचारावा की, माझ्यावर कोणत्याही बँकेचे, पतसंस्थेचे, बचत गटाचे, सावकाराचे, घरासाठी, दवाखान्यासाठी, कोर्टाच्या चकरा मारण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, पोलीस स्टेशनसाठी खेटरं झीजविण्यासाठी कर्ज काढून कर्जबाजारी झालो आहोत. त्याचे व्याज आणि मुद्दल फेडण्यासाठी).

     म्हणजे थोडक्यात आम्ही भारतीय जनता गेल्या 75 वर्षात दुःखी असून अजिबात सुखी नाही हे सिद्ध झाले आहे…..!

     हे जर वास्तव असेल तर सॉक्रेटीसने म्हटल्या प्रमाणे आम्हाला समाजपरीक्षण करण्यासाठी……..

  प्रत्येक जातीतील – धर्मातील समंजस युवापिढीने पुढे येऊन या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी समाज जागृती केलीच पाहिजे…….. 

        त्यासाठी याच समंजस युवापिढीने प्रथम जात – आणि धर्माचा मोठा ” अडसर ” दूर केलाच पाहिजे…….

       तरच पुढील पिढीचे भविष्य उज्वल दिसेल,…….

    अन्यथा नाल्यातील किड्याप्रमाणे एक दिवस स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन घेऊया…………

    ही क्रांती थोडीशी अवघड आहे , अशक्य तर अजिबात नाही, केवळ आणि केवळ बोटावर मोजण्याइतक्या बहुजन समाजातील सुशिक्षित म्हणण्यापेक्षा समंजस युवापिढीने (युवक आणि युवती ) पुढाकार घेतला पाहिजे…….

    तर ते अजिबात अशक्य नाही……….

आवाहनकर्ता आणि जागृतीचा कृतिशील लेखक 

         अनंत केरबाजी भवरे 

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689