ब्रेकिंग न्यूज… — कांद्री येथे खुन करणाऱ्या आरोपीचा लावला शोध… — स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांची कारवाई,चार आरोपी अटक…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी :- फिर्यादी नामे जितेंद्र टिकाराम बर्वे वय ३२ वर्षे,सदृभावन नगर,पानतावने कॉलेज जवळ कांद्री कन्हान यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथे रिपोर्ट दिली की,त्याचा भाऊ नामे महेंद्र टिकाराम बर्वे,वय ३२ वर्षे,हा दिनांक २३/०३/२०२५ चे रात्री २२:३० वाजता जेवण झाल्यावर त्याच्या फोनवर बोलत घराचे बाहेर फिरत होता.

        मृतक रात्रभर घरी परत न आल्याने मृतकाच्या पत्नीने फिर्यादीला सदर बाब सांगितली.त्यामुळे फिर्यादी व मृतकची पत्नी यांनी दोघांनी मिळून मृतकाचा शोध घेत असतांना मृतकच्या पत्नीला फोन आला की,मृतक नामे महेंद्र टिकाराम बर्वे याचे प्रेत हरडे ले-आउट येथे पडले असुन त्याला कोणीतरी अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वार करून त्याचा खुन केला आहे. 

      सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे कन्हान येथे अज्ञात आरोपी विरूद्ध कलम १०३ (१) भा. न्या.सं २०२३ अन्वये गुन्हा नोंद केला होता.

      श्री हर्ष ए. पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण,यांच्या मार्गदशनात कन्हान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांनी तात्काळ अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. 

       गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पध्दतीने तपास करत स्थानिक गुन्हे शाखा,नागपुर ग्रामीण यांनी अवघ्या १० तासात आरोपीतांचा शोध लावला.

         सदर गुन्ह्यात पोलीसांनी आरोपी नामे तुषार राजेश गुरधे वय २३ वर्षे रा.पिंपरी कन्हान याला ताब्यात घेतले आहे. 

       नमुद आरोपी आणि त्याच्यासह तीन विधीसंघर्ष बालकांनी मिळुन पैशांच्या वादातुन मृतकाचा खुन केल्याची माहीती कबुल केली.

        खुनातील चार आरोपींना अटक केली.चार आरोपींपैकी ३ विधि संघर्ष बालकाचा समावेश असुन पुढील तपास कन्हान पोलिस करित आहे.