ग्रामगीता महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती साजरी…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोज सोमवारला संत गाडगे महाराज यांची 149 वी जयंती साजरी करण्यात आली.

           या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.सुनंदा आस्वले व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदीप सातव, डॉ.निलेश ठवकर आणि प्रा.संदीप मेश्राम उपस्थित होते.

          याप्रसंगी डॉ.सुनंदा आस्वले यांनी कर्मयोगी श्री.संत गाडगे महाराज यांनी कशाप्रकारे आपल्या कार्यातून समाज प्रबोधन केले व श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत संपूर्ण समाजाला एक नवा विचार दिला.त्याचप्रमाणे गाडगे महाराज यांनी आपल्या आयुष्यभर कष्टाला प्रतिष्ठा दिली व मेहनतीचे महत्त्व समाजाला पटवून दिले.त्यांच्या शिकवणींनी अनेकांना नवा मार्ग दाखवला असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितले.

           या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ.सुमेध वावरे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ.बिजनकुमार शील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.