
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
सिकलसेल आजाराचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आहे. त्याबाबत लोकांमध्ये लोक जागृतीची चळवळ ही लोक चळवळ व्हावी असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दहिफळे यांनी किसान भवन धानोरा येथे आयोजित तालुकास्तरीय सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम व जनजागृती कार्यक्रमाचे प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले.
सदर शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार लोखंडे मॅडम यांनी केले, तर प्रमुख अतिथी म्हणून सिताराम बडोदे ,गोडलवाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुणाल मोडक, डॉक्टर डोंगे ,तालुका आरोग्य पर्यवेक्षक अरविंद कोडाप्, एक्स-रे तंत्रज्ञ हंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर दहिफळे म्हणाले की शक्यतोवर रक्ताच्या नात्यांमध्ये लग्न करणे टाळावे, जेणेकरून सिकलसेल आजाराचे संक्रमण काही प्रमाणात आपण थांबवू शकू. सदर शिबिराप्रसंगी उद्घाटकीय स्थानावरून बोलताना लोखंडे मॅडम यांनी जनतेस आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदर शिबीरामध्ये 700 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.धानोरा तालुक्यात 2200 सिकलसेल रुग्ण असून त्यापैकी 300 रुग्ण हे डबल एस पॅटर्नचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्या प्रसंगी डॉक्टर मोडक, डॉक्टर ढोंगे,सीताराम बडोदे यांनी समायोजित मार्गदर्शन केले. कार्यक्रमात क्षयरोग कुष्ठरोग व अन्य पथकांनी रक्त तपासण्या केल्या. कार्यक्रमाचे संचालन गिरीश लेनगुरे, प्रास्ताविक अरविंद कोडाप यांनी तर आभार अनिल शंकावार यांनी मानले.