युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
गट ग्राम पंचायत नांदरुन,पाथरविरा येथील म गां रो ह योजने अंतर्गत रोड चे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे केलेले आहे. असा आरोप नांदरुन येथील सामाजिक कार्यकर्ते व आक्रमण संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शिलवंत रायबोले यांनी लेखी स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभाग , उपविभागीय अभियंता दर्यापूर यांना लेखी स्वरूपात दिलेल्या निवेदनातून केला आहे.
वॉर्ड नं.३ मधील ज्या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे ते पूर्णपणे खराब केलेले असून त्या रोड वरती दगड टाकताना ते दगड खोदून न टाकता ते वर वर टाकून त्याच्यावरती दबाई न करता त्याच्यावरती पुन्हा मोठा दगड टाकून त्या कामावरती लगेच सिमेंटचे बांधकाम करण्यात आले काही काही ठिकाणी मुरूम गिट्टी चा वापर न करता तसेच सिमेंटचे बांधकाम करण्यात आलेले आहे.सदर बांधकाम केलेल्या कामाचे पूर्ण फोटो तक्रारकर्त्याकडे उपलब्ध आहेत. त्या रोडच्या इस्टिमेट नुसार बांधकाम नसून थातूरमातूर पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे.
इंजिनीयर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता किंवा त्यांना ऑफिसमध्ये भेटून सुद्धा त्यांनी असे सांगितले की तुम्हाला माहिती आहे का या रोडचे काम आम्ही कसे केले आहे म्हणून फोन केला असता ते असे सांगत आहेत की ऑफिसमध्ये येऊन भेटा मी ह्या गोष्टी फोनवरती बोलत नाही किंवा करत नाही तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या गावात दहा लाख रुपयांचा निधी आलेला आहे म्हणून असे इंजिनियर प्रज्वल सावरकर यांनी सांगितले आहे. इस्टिमेटच्या सांगण्यानुसार मेन रोड ते विजय रायबोले यांच्या घरापर्यंत रोड असून त्या रोड चे बांधकाम पहिला टप्पा आणि शेवटचा टप्पा सोडून ते बांधकाम दोन्हींच्या मधोमध करण्यात आले आहे. एका ठिकाणी काम जास्त करायचं दुसऱ्या ठिकाणी काम कमी करायचं असं का करण्यात येते असा आरोप केला आहे दोन्ही रोडचे मोजमाप करून व सखल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आक्रमण संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छळण्यात येईल असा आरोप तालुका उपाध्यक्ष आक्रमण युवक संघटना दर्यापूर शिलवंत रायबोले यांनी केला आहे.
प्रतिक्रिया
उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क केला असता. त्या साईट वरती येऊन त्या कामाची पाहणी करण्यात येईल असे सांगितले आहे.
उपविभागीय अभियंता महेंद्र धनबर सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर नांदरून येथे मगरोह योजने मधून केलेले बांधकाम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे व रोड वरती कुठल्याही प्रकारचे रोलिंग सुद्धा करण्यात आलेले नाही. त्या उघड्या दगडावरती सिमेंटचे बांधकाम करण्यात आलेले आहे जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करण्यात यावी.
आक्रमण संघटना दर्यापूर तालुका उपाध्यक्ष शिलवंत रायबोले