अबोदनगो सुभाष चव्हाण
चिखलदरा तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत
चिखलदरा / बुधवार पासून 12 वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली.त्यातही पहिला पेपर भाषेचा होता,अशातच सर्वच मुलामुलींची परीक्षा केंद्रावर गर्दी दिसून आली.त्यात चिखलदरा तालुक्यातील श्री.गुरुदेव तुळशीरामजी काळे विद्यालय तेलखार येथे मौजा मोरगढ गावातील भाग्यश्री रमेश बारवे महिला आपल्या तान्हा राजविर वय 6 महिने ला घेऊन परीक्षा केंद्रावर दिसून आली.
तिने आपल्या तान्ह्या बाळाला कुशीत घेत जेमतेम रोल नंबर मिळवला व पाण्याचा घुट घेतला.सोबत सासूबाई सुद्धा होत्या ,बाळ रडत सुद्धा होता.पण समोर भविष्याची चिंता असल्याने भाग्यश्री ने राजविर ला सासूबाई कडे सांभाळायला दिले.
मधात बाळ जास्तच रडत असल्यामुळे आईला बाळाला स्तनपान करण्याची मुभा देण्यात आली.त्याकरिता श्री.गुरुदेव विद्यालय व परीक्षा केंद्रावर जमलेल्या प्राचार्य व शिक्षक शिक्षिकांनी मदत केली.
राजविर चे वय सध्या जेमतेम सहा महिनेच झाले आहे.त्यात भविष्यात शिक्षण घेतल्यावर काही फायदा होईल या आशेने एकीकडे बाळ व दुसरीकडे भविष्याची चिंता असल्यामुळे परिस्थितीचा सामना करीत परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी राजविर ला सोबत घेऊन आली असे भाग्यश्री ने सांगितले.एकीकडे भविष्याची तर दुसरीकडे बाळाची चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.