चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी व्दारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनीचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर “स्वच्छ भारत – स्वस्थ भारत” या संकल्पनेवर आधारीत १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जि. प. उच्च प्राथमिक शाळा रेंगेपार / कोठा येथे घेण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटकीय कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत रेंगेपार / कोठा सरपंच अश्विन काडगाये यांनी शिबिराचे उद्घाटन केले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सारंगधर काडगाये, पोलीस पाटील नंदलालजी काडगाये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन शिबीर विद्यार्थी प्रमुख विनय रोकडे, प्रास्ताविक प्रा. धनंजय गिऱ्हेपूजे कार्यक्रम अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन शिबीर विद्यार्थिनी प्रमुख कु. श्रेया काडगाये हिने केले.
सात दिवसीय विशेष शिबीरामध्ये प्रभातफेरीच्या माध्यमातून भारत माता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, जिजामाता, श्रीराम- सीतामाता, विठ्ठल रखुमाई इत्यादी वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या. पथनाट्याच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, बेटी बचाओ – बेटी पाढाओ, मोबाईलचे दुष्परिणाम, पर्यावरण समस्या, इत्यादी सामाजिक विषयांवर समाज प्रबोधन करण्यात आले. रेंगेपार /कोठा येथील “मानव कल्याण वृद्धाश्रमात” रासेयो स्वयंसेवकांनी भेट देऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान अंतर्गत श्रमदान केले.
तसेच उपस्थित वृद्धांशी चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेतल्या. फराळ वितरण करून वृद्धाश्रमातील वृद्धाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक गुलाब लांजेवार महाराज यांनी वृद्धाश्रमाची माहिती दिली. रवि लांजेवार यांनी आभार मानले.
दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये ” करे योग – रहे निरोग” या विषयावर सुनिल भाग्यवानी, कविता मोडकिरे यांनी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे औचित्य साधून “ग्रामोन्नती आणि शिवाजी महाराज” या विषयावर प्रा. लुलेश्वर धरमसारे विदर्भ महाविद्यालय लाखनी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. लालचंद मेश्राम समर्थ महाविद्यालय लाखनी हे होते. “महिला सक्षमीकरण” या विषयावर डॉ. सुनंदा रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. निलिमा कापसे विदर्भ महाविद्यालय लाखनी यांचे मार्गदर्शन लाभले. “मतदार जागृती” या विषयावर डॉ. धनंजय गभने समर्थ महाविद्यालय लाखनी यांनी नवमतदारांना मतदानाचे महत्त्व सांगितले.
समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर अध्यक्षस्थानी होते. उपस्थीत स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. सुरेश बंसपाल यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन धनश्री पत्रे तर प्रास्ताविक प्रा. धनंजय गिऱ्हेपूजे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. बंडू चौधरी कार्यक्रम सहअधिकारी यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमात स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिबिराच्या यशस्वीतेकरीता राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या मार्गदर्शनात प्रा. लालचंद मेश्राम, डॉ. संगिता हाडगे, डॉ. सुनंदा रामटेके, कॅप्टन बाळकृष्ण रामटेके, डॉ. स्मिता गजभिये, डॉ. संदीप सरैया, प्रा. रामभाऊ कोटांगले, डॉ. सुरेश बंसपाल, डॉ. अर्चना मोहोळ, प्रा. अजिंक्य भांडारकर, मंगेश शिवरकर, श्यामराव पंचवटे, दिनेश सलामे यांचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायत रेंगेपार / कोठा सरपंच अश्विन काडगाये, तंटामुक्ती अध्यक्ष सारंगधर काडगाये, पोलीस पाटील नंदलाल काडगाये, गौरीशंकर तितिरमारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. धनंजय गिऱ्हेपूजे, सहप्रमुख डॉ. बंडू चौधरी यांनी सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.