दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
आलापल्ली:-
एटापल्ली तालुक्यातील (पेठा) तोडसा ग्रामपंचायत मध्ये नुकत्याच निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंचाच्या वनीताताई कोरामी हिचे आलापल्ली विश्रामगृहात माननीय खासदार अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट देत ग्रामपंचायतीचे उन्नतीचे काम करण्याकरिता शुभेच्छा दिल्या.
त्याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम,आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप कोरेत तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.