नागपूर येथे २८,२९ व ३० जानेवारीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे ५३ वे प्रदेश अधिवेशन…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

          आज दिनांक २५ जानेवारी आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते नागभीड येथील जनसंपर्क कार्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचे ५३ वे प्रदेश अधिवेशन दि. २८,२९ व ३० जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे संपन्न होत असून त्यानिमित्ताने अभाविप नागभीड शाखेच्या वतीने अधिवेशनाचे पोस्टर विमोचन करण्यात आले.

             याप्रसंगी आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांशी संवाद साधून अधिवेशनाकरिता शुभेच्छा दिल्या.

        यावेळी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.