प्रीती दीडमुठे माणिक रत्नाने सन्मानित… 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

           चिमुर तालुक्यातील जवळच असलेल्या साठगाव येथील उपसरपंच तथा साहित्य लेखिका प्रीती दीडमुठे यांना वणी येथे ग्राम स्वराज्य महामंचच्या वतीने माणिक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

           तुकड्याची झोपडी ही स्मरणिका महामंच वतीने प्रकाशित करण्यात आली होती. त्यात दीडमुठे यांनी इंटरनेट डाटा फुल मुलांचे आयुष्य गुल यावर आधारित लेख लिहिला होता या लेखा बद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

           यावेळी ग्रामस्वराज्य संघाचे मोहन वडतकर माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप उपस्थित होते.