नॉन काँग्रेस – नॉन भाजप तत्वावर आघाडी… — आंबेडकरी ऐक्याची दुसरी बैठक संपन्न…  — 5 फेब्रुवारी ला निर्णायक बैठक…..

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली : आंबेडकरी पक्ष गटातटात विभागल्याने मतविभाजन होऊन चळवळीचे राजकीय अस्तित्व लयास गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आंबेडकरी पक्ष व संघटना एकत्रित येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका घेऊन स्थानिक विश्रामगृहात बहुजन – आंबेडकरी पक्षांची दुसरी बैठक संपन्न झाली. 

           आजच्या बैठकीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, राज्य उपाध्यक्ष प्रकाश दुधे, आजाद समाज पार्टी चे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष भास्कर मेश्राम, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मंगलदास चापले, बिआरएसपी जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश सचिव प्रमोद बांबोळे, जिल्हाध्यक्ष अमर खंडारे, बिआयएस च्या उज्वला शेंडे, सामाजिक कार्यकर्ते सुखदेव वासनिक, शेकाफे चे पंडित मेश्राम, रिपाई कडून चोखोबा ढवळे इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.

         आजाद समाज पार्टी, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, शेड्युल कास्ट फेडरेशन, रिपाई इत्यादी पक्षांनी एकत्रित येण्या संदर्भात पूर्णतः तयारी दर्शविली असून बसपा आणि बिआरएसपी या दोन पक्षांनी वरिष्ठ्य नेते आणि प्रोटोकॉल च्या अडचणी सांगत पुढील 5 फेब्रुवारीच्या बैठकीत अंतिम निर्णय देण्याचे आश्वासन दिले.

          जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ व जे येणार नाही त्यांना बाजूला ठेवू असा नारा देत उपस्थित आंबेडकरी समूहाने कोणत्याही परिस्थिती मध्ये एकीकरण व्हावे नाहीतर समाज त्यांना धडा शिकविणार असा इशारा यावेळी दिला.

        पुढील बैठक निर्णयात्मक असून 5 फेब्रुवारी ला दुपारी 1 वाजता विश्रामगृहात ठेवलेली आहे. त्यामध्ये जे एकत्रिकरणास तयार आहेत त्यांची कोअर कमिटी बनवून प्रेस कॉन्फरेन्स घेण्यात येईल आणि घोषणा करण्यात येईल असे यावेळी सर्व पक्षीय निर्णय झाला. 

         संचालन पुरुषोत्तम रामटेके तर आभार धनराज दामले यांनी मानले. सदर बैठकीला दिवाकर फुलझेले, नागसेन खोब्रागडे, प्रल्हाद रायपुरे, हंसराज उराडे, सुधीर वालदे, विवेक खोब्रागडे, अरविंद वाळके, नितेश वेस्कडे, केशव सामृतवार, शांतीलाल लाडे, शेषराव तुरे, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे, लोमेश अलोणे, नरेश महाडोळे, विलास गोवर्धन गडचिरोली शहरातील व परिसरातील बहुसंख्य नागरिक तथा सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.