भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री.जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा येथील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिनाच औचित्य साधून राज्यशास्त्र विभागा द्वारा चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
तसेच महाविद्यालय व तहसील कार्यालय धानोराचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन प्रसंगी मतदानाबाबत जाणीव जागृती निर्माण व्हावी व लोकशाही सशक्त व्हावी या दृष्टीने जनजागृती रॅलीची सुरुवात श्री.वलके साहेब नायब तहसीलदार,निवडणूक विभाग यांचे शुभहस्ते करण्यात आली.
महाविद्यालय ते पोलीस स्टेशन, बस स्थानक, तालुका न्यायालय, मुख्य बाजारपेठ, येथील मार्गाने मतदान जनजागृती बाबत घोषवाक्य देऊन तहसील कार्यालय धानोरा येथे रॅली चा समारोप करण्यात आला.
सदर कार्यक्रम व रॅली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थूल यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली. रॅली समारोप प्रसंगी रासेयो प्रमुख डॉ.संजय मुरकुटे, डॉ. आर पी किरमिरे प्रा. ज्ञानेश बनसोड डॉ.पकज चव्हाण,डॉ. गणेश चुधरी डॉ.पंढरी वाघ,डॉ. बी झाडे, प्रा एम जे तोंडरे, प्रा.एन पी पुण्याप्रेद्दीवार , डॉ.पठाडे प्रा.टी बी धाकडे, प्रा.बी पी करमनकर, प्रा के खोब्रागडे प्रा रणदिवे प्रा.आवारी,आशिक मडावी.प्रा. वटक ,प्रा. मण्डल, इतर प्राध्यापक वृंद ,विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते..