मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम सकाळी ९.१५ वाजता…

ऋषी सहारे

  संपादक

गडचिरोली : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वज फडकविण्यात येणार आहे.

            सदर कार्यक्रम रविवार, दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलिस कवायत मैदान, पोलिस मुख्यालय, गडचिरोली येथे होणार आहे.