शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
पराठीच्या पिकात वाघ निघाल्याची माहिती होताच नागरिकांनी मोठ्या संख्येने वाघ बघण्यासाठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वण विभाग व पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
चिमूर मासळ रोड वरील पराठीच्या पिकात पट्टेदार वाघ असल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. परिसरात या घटनेची माहिती होताच वाघाला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी व पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
सकाळी ९ वाजता रस्त्यावरून शेतात वाघ दिसल्याने नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. त्यांना पराठीच्या पिकात वाघ दिसला. नागरिकांनी आपल्या मोबाईल मधे व्हिडिओ काढले. नागरिकांची गर्दी जास्त झाल्याने व नागरिकांच्या गोंगाटाने वाघ शेतातून बाहेर निघून घनदाट झुडपात जाऊन लपला. या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर वन तफ्यासहित घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांचा मोठा गोंगाट असल्याने वाघाला हुसकाऊन लावणे कठीण जात होते.
यावेळी चिमूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे,पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम घटनास्थळी दाखल होऊन गर्दी नियंत्रणात आणली.