दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे, के.के. हॉस्पिटल चंदननगर व पारसनाथ क्लिनिक यांच्या विशेष सहकार्याने सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी शिखर संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रपती पोलिस पदकाचे मानकरी संपतराव जाधव व पुणे शहर उपाध्यक्ष रवींद्र कामठे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस बांधवाच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर आरोग्य शिबिराचे उद्घाटन रवींद्र पठारे, डॉ.सीमा खैरे, डॉ.भालचंद्र महामुनी, व माजी नगरसेविका उषाताई कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबिरात १७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिरात के.के.हॉस्पिटल यांच्या सहकार्याने प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ.सीमा खैरे मार्गदर्शनाखाली संपूर्ण डोळ्यांची संगणकीय मशीन तसेच मॅन्युअली उपकरणांनी नजर तपासणे, चष्म्याचा नंबर काढणे, मोतीबिंदू तपासणी, डोळ्यांचा पडदा तपासणी तसेच शुगर, उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली.
यावेळी वरीष्ठ पो.नि.अनिल माने, शिरुर ग्रामीणचे सरपंच नामदेवराव जाधव, अशोक गुंजाळ, नानाभाऊ मापारी, श्रीरंग लंघे, बंडू जाधव, प्रकाश लंघे, शरद बोंगाळे, सदाशिव भगत, फत्तेसिंह गायकवाड, हनुमंत घाडगे तसेच विविध विभागांचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.