
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशीवनी::-पारशिवणी येथील दिल्ली इंग्लिश मिडीयम स्कूल व हायस्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासाच्या दृष्टीने त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणनांना वाव मिळावा या हेतूने एक दिवसीय सांस्कृतिक वार्षिक समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ज्ञानरांजन क्रीडा बहु.संस्था पारशिवाणीचे अध्यक्ष श्री.विजयकुमार बोथरा,उपाध्यक्ष माणिक मेश्राम,सचिव प्रकाशजी डोमकी,सदस्या सुनिताताई डोमकी,संचालिका कू.जान्हवी प्रकाश डोमकी,साईबाबा कला व विज्ञान महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. योगेंद्र नगराळे,दिल्ली इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक श्री.मुरलीधर चहांदे,प्रा.अनिल बोंद्रे,प्रा.विनोद पुरकाम व विद्यालातील सर्व शिक्षक,शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
पालकांनी आपल्या पाल्यांच्या भविष्याचा विचार करता शाळेत प्रवेश घेताना त्या शाळेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रवेश घ्यावा,असे मत संचालन प्रा.राकेश कभे यांनी व्यक्त केले तर आभार सौ.निहारिका जळीतकर यांनी केले.