ऋषी सहारे
संपादक
आरमोरी-ब्रह्मपुरीवरून -गडचिरोलीकडे अवैधरित्या देशी दारूच्या पेट्या चारचाकी वाहनातून नेत असलेल्या वाहनाला आरमोरी पोलिसांनी अटकाव करून,वाहनांची पाहणी करून दारुसहित ४ लाख ९० हजार
रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना दिनांक २४ जानेवारीला रात्रौ १० ते १०.३० च्या सुमारास घडली.अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव हरीदास विजय राऊत वय ३४वर्षे रा. इंदिरा वार्ड गडचिरोली. सुमन शिवराज मरपल्लीवार वय ३२ वर्षे रा. गोकुलनगर, गडचिरोली असे आहे.
आरमोरी पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, आरमोरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ब्रम्हपुरीकडुन आरमोरी ते गडचिरोलीकडे चारचाकी स्विफ्ट बाहन क्रमांक MH-31- EA-8373 या वाहनाने देशी दारुची वाहतुक करीत आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने,आरमोरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मनोज काळबांडे यांनी पो.ह.राजू उराडे, पोलिस नाईक नरेश वासेकर, अकबर पोयाम, पो .शि. शैलेश तोरपकवार, पो.शि.एकनाथ ढोरे ,बांबोले मेजर व सोबत दोन पंच घेऊन माहीतीप्रमाणे आरमोरी येथील गाढवी नदी शिव मंदीर जवळ, आरमोरी येथे पाळत ठेवून असताना ,आरमोरीकडुन एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने येतांना दिसुन आल्याने त्याला थांबविण्याकरीता आरमोरी पोलिसांनी हाताचा इशारा दिला असता चालकाने त्याचे ताब्यातील वाहन रोडचे बाजुला थांबवले .आरमोरी पोलिसांनी मारोती सुझुकी कंपनीची एम. एच.-३१इ.ए. ८३७३ स्विफ्ट ही चारचाकी गाडीथांबवून वाहनांची तपासणी केली व वाहनांची डिक्की उघडुन पाहणी केली असता, त्यामध्ये रॉकेट देशी कंपनीच्या मापाचे भरलेले खाकी रंगाचे ९० हजार रुपये किमतीचे१५ बॉक्स मिळुन आले.तसेच गाडीची किंमत ४लाख रुपये असा एकूण ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर बाबत वाहनातील इसमांना विचारणा केली असता देशी दारु गडचिरोली जिल्हातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करण्याकरीता घेवुन जात असल्याचे पंचासमक्ष आरोपींनी सांगितले. आरमोरी पोलिसांनी सदर वाहन व दारू जप्त केली असून आरोपीविरोधात कलम 65 (1).98 (2) 83 दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला .अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांचे नेतृत्वात आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक नरेश वासेकर करीत आहेत.
मागील दोन महिन्यांपासून आरमोरी तालुक्यातील अवैध दारूविक्री ठाणेदार काळबांडे यांनी बंद केली असून,अवैध दारूविक्रेत्यांना मेटाकुळीस आणले आहे.त्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.या दोन महिन्यात ठाणेदार काळबांडे यांनी अनेक अवैध धंदे करणाऱ्या आरोपींचा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा आणला आहे.अवैध धंदे करणाऱ्या अट्टल आरोपींवर आरमोरी पोलीस अहोरात्र कडक नजर ठेवून असल्याने अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे..