अनोळखी अल्पवयीन मुलावर ३५० रुपयासाठी चाकूने केले ६० वार.. — मुलाचा मृत्यू..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

          वृत्त संपादीका 

       राजधानी दिल्लीतून अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे.केवळ ३५० रुपयांसाठी चाकूने ६० वार करून खून केल्याची थरारक घटना घडली.

          ६० वेळा चाकूने वार करुन अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे.आरोपीने क्रुतापुर्वक विकृती करीत मुलाच्या मृतदेहा शेजारी डान्स केला.हा सगळा धक्कादायक प्रकार स्थानिक घटनाक्रम स्थळाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. 

           गंभीर खून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

         भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत १६ वर्षांच्या मुलाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची एका गल्लीत चाकूने भोसकून हत्या केली. 

        आरोपीने अल्पवयीन मुलीच्या छातीवर आणि मानेवर चक्क ६० वेळा वार केले.आरोपीने मृतक मुलाची मान कापण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्यावर लाथा मारल्या असल्याचे समोर आले आहे. 

             बेडर आरोपींनी शेजारच्या नागरिकांना चाकूचा धाक दाखवून धमकावल व या घटने नंतर त्यानीच जखमी मुलाला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सदर गंभीर मुलास मृत घोषित केले.

         घटना तपास अधिकारी

          धक्कादायक प्रकार उत्तर पूर्व दिल्लीतील वेलकम पोलीस ठाण्याच्या परिसरात मंगळवारी घडला.पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन बुधवारी सकाळी १६ वर्षीय आरोपीला अटक केली. 

        आरोपी मुलाने शाळा सोडली असून तो पालकासोबत दिल्लीत राहत होता.

      हत्या झालेला मुलगा हा जाफ्राबादजवळ आईसोबत राहत होता.हत्या झालेला अल्पवयीन मुलगा आरोपीला ओळखत नव्हता असे पोलिसांचे म्हणणे आहे.

          आरोपीने मृतक मुलाकडे बिर्यानी खाण्यासाठी ३५० रुपये मागितले होते.पीडित मुलाने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने मुलाचा गळा दाबला आणि त्याला बेशुद्ध केले. 

          त्यानंतर आरोपीने रात्री १० वाजता नंतर गंभीर जखमी मुलाला तशाच अवस्थेत एका गल्लीत खेचत आणले व त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मुलावर सपासप वार केले.आरोपीने मान,गळा,व कानावर चक्क ६० वेळा वार केले.