लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे आमच्या कुटुंबाचे कुलदैवत आहे. नेहमीच मी दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो :-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…  — लक्ष्मी नरसिंहाची व महायज्ञाचीही पूजा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पत्नी अमृता फडणवीस यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला…

बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

 लक्ष्मी नरसिंहाची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, सह पत्नी अमृता फडणवीस यांच्या समवेत घेण्यात आले , तर लक्ष्मी नरसिंह चरणी नतमस्तक होऊन ,, चालू आसलेल्या महायज्ञाची महापुजा व दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. 

      यावेळी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आसताना म्हणाले की,,, लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे सर्वयज्ञ मोठे दैवत आसल्यामुळे बाकी काही बघावेच लागत नाही त्या ठिकाणी कोणतीच कमतरता नाही. व त्यांचाच आशीर्वाद नेहमी पाठीशी असतो. 

       श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे आमचे कुलदैवत आहे. मी वारंवार दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येत आसतो. मध्यंतरीच्या काळामध्ये येणे झाले नव्हते म्हणून विठुराया चरणी कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी मला येण्याचा योग आला. याच वेळेस लक्ष्मी नरसिंहाच्या चरणीही पूजा करण्याचाही योग आला आहे. त्यांचाच आशीर्वाद नेहमी पाठीशी आसतो म्हणूनच मला आज आनंद आहे. देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

       यावेळी, खासदार रंणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रंणजीत सिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील मोहिते पाटील, उदयसिंह पाटील, विकास पाटील, तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे, नरसिंहपुरचे सरपंच आर्चना सरवदे, सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, विलास वाघमोडे, सुरेश शिंदे, गजानन वाकसे, सागर इंगळे, लक्ष्मी नरसिंह देवस्थानचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त आणि नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, आनेक भागाभागातून आलेले ग्रामस्थ व भाविक भक्त या सर्वांची प्रमुख उपस्थिती होते.

        या कार्यक्रमासाठी आलेले सर्वच पदाधिकारी मान्यवर व ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.