त्याच तत्ववेत्यांच्या क्रांतिकारकांच्या,महापुरुषांच्या क्रांतीला अभिवादन करुन आम्ही भारताचे लोकं,आज 31 डिसेंबर 2024 च्या मावळत्या सूर्याला आणि 1 जानेवारीच्या सूर्योदयाला साक्षी ठेऊन एक दृढसंकल्प करत आहोत की, इथून पुढे येणारा आमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा या क्रांतिकारकांच्या क्रांतीला सर्वसामान्य जनतेपर्यंत म्हणजे जगाच्या शेवटच्या नागरिकांच्या सदसदविवेक बुद्धीपर्यंत पोहचवून जागृत करण्याचे नैतिक कर्तव्य पार पाडण्याचा दृढसंकल्प करत आहोत….
कारण आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिसऱ्या व अंतिम जागतिक अणुयुद्धाची शक्यता काही बलाढ्य राष्ट्राकडून वाढलेली आहे.त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेचे हात बळकट करण्यासाठी,विशेषकरुन मानवी हक्क आयोगाचे हात बळकट करण्यासाठी,जात,धर्म,लिंग,वर्ण,पंथ,राजकीय,इत्यादी भेदाच्या भिंती भेदून ” मानवता धर्म ” कसा इतर सर्व धर्मापेक्षा कसा सर्वश्रेष्ठ आहे. हे सिद्ध करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
ज्याप्रमाणे या जगाचा प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या धर्माचा पाईक आहे,अनुयायी आहे.आणि प्रत्येक धर्माचे तत्वज्ञान हे माणसाच्या भल्यासाठीच असतांना,या जगात वाईटच का घडतं.?
हा यक्ष प्रश्न आज आमच्यासमोर उभा आहे…
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा या लेखमालेतून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
या जगात पवित्र ख्रिश्चन धर्म आहे,त्याचा पवित्र धर्मग्रंथ “बायबल “आहे.पवित्र इस्लाम धर्म आहे,त्याचा धर्मग्रंथ ” कुराण शरीफ “आहे.पवित्र शीख धर्म आहे, त्याचा धर्मग्रंथ “गुरुग्रंथ साहिब “आहे.पवित्र बौद्ध धम्माचा ग्रंथ “त्रिपीटक “आहे. हिंदूंचा वेद आहे.शिवाय नास्तिक लोकांचा चार्वाक ऋषी आदर्श आहेत.
परंतू,तरी सुद्धा या जगात वाईटच घडत आहे.याचे मुख्य कारण एकच हे आहे की,या सर्व धर्मापेक्षा जो एक धर्म सर्वश्रेष्ठ आहे…
तो म्हणजे मानवता धर्म…
जो विज्ञानवादी + विवेक वादी + निसर्गनियमांना अनुसरणारा = मानवतावादी आहे.
आणि या सर्वश्रेष्ठ धर्माचा पवित्र धर्मग्रंथ म्हणजे….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेले,”भारताचे संविधान आहे……
अशा मानवतावादी असलेल्या,आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या भारतीय संविधानाला येथील आणि जगातील संविधानविरोधी व मानवताविरोधी शक्तीला कायमचे नष्ट करण्यासाठी आम्ही भारताचे लोकं हे संविधान स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करण्याची शपथ घेत आहोत.
******
पुढील भाग उद्याच्या भाग = 3 मध्ये असेल..
*****
आवाहनकर्ता जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689…