दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : अखिल भारतीय मराठा महासंघाला यंदा १२५ वर्ष पुर्ण होत असुन वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्याच अनुषंगाने आळंदी येथे भव्य संतपुजन सोहळ्याचे आयोजन गोपाळपुरा येथील श्री ज्ञानेश्वरी मंदिरात करण्यात येणार आहे.
याप्रसंगी शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर व १२५ संत महात्म्यांचे संतपुजन होणार आहे. अशी माहिती हभप चैतन्य महाराज कबीरबुवा व भाजपा आध्यात्मिक आघाडीचे संजय महाराज घुंडरे पाटील दिली.
यावेळी संतपुजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहाणार आहे.
या संतपुजन सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, संभाजी दहातोंडे, दशरथ पिसाळ, श्रीरंग बर्गे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, रोहीदास तापकीर, संयोजन समिती अध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, डि.डि.भोसले पाटील, विलास घुंडरे, रमेश गोगावले, सचिन गिलबिले, तुषार घुंडरे, पद्मराज रानवडे,सौरभ गव्हाणे, शशिकांत राजेजाधव, अविनाश तापकीर, बब्रुवाहन शेंडगे व वारकरी संप्रदाय, आळंदीकर ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.