युवराज डोंगरे/खल्लार

खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कोकरडा व कसबेगव्हाण येथील वरली व अवैध गुटखा विक्रेत्यांवर खल्लार पोलिसांनी काल दि 23 डिसेंबरला धाड टाकून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

खल्लार पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोकरडा येथे धाड टाकली असता जगदेव झिंगुजी पवार वय 32 वर्ष याच्याजवळून वरली मटक्याचे साहित्य व नगदी 275 रुपये असा मुद्देमाल ताब्यात घेतला आरोपी जगदेव पवार याच्याविरुध्द अप न292/22 मुजुका 12(अ)नुसार गुन्हा दाखल केला.

तर दुसऱ्या घटनेत कसबेगव्हान अवैध गुटखा विक्री असलेल्या जमीलोद्दीन अलीमोद्दीन वय 40 वर्ष हा अवैध गुटखा विक्री करीत असल्याची माहीती मिळाली त्यानुसार जमीलोद्दीन अलीमोद्दीन याची झडती घेतली असता त्याच्या जवळून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला  640 रुपयांचा नागपुरी प्रीमियम गुटखा,400 रुपयांचा नजर गुटखा, तर 360 रुपयांचा विमल गुटखा असा एकुण 1400 रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला.आरोपी याच्याविरुध्द अप न293/22,कलम 188,272,273 नुसार गुन्हा दाखल केला

या दोन्ही कारवाया खल्लार पोलिसांनी ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर घुगे, परेश श्रीराव, विजय निमकांडे यांनी केल्यात

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com