कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी :- पारशिवनी तालुका तिल आमगाव बाबुलवाडा ग्राम पंचायत हद्दीतिल बाबुलवाडा गाव येथिल जिल्हा परिषद.प्राथमिक शाळा बाबुळवाडा येथे परमपुज्य साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांची जयंती चे कार्यक्रम शाळेतिल सभागृहात मुख्याध्यापक श्री. उमाकांत बांगडकर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला.सहाय्यक शिक्षिका सौ.सारिका भोयर मँडम यांनी साने गुरुजी लिखीत गीत गायन केले,कार्यक्रमाचे संचालन केले.श्री उमाकांत बांगडकर सर यांनी आपल्या भाषनातून साने गुरुजी यांचे शैक्षणिक श्रेत्रात व सामाजिक श्रेत्रात केलेले मोलाचे कार्य बद्दल आणि जीवन परिचय दिला. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले .