दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
चाकण : चाकण शहरातील माणिक चौक ते मुटकेवाडी दरम्यान मच्छी मार्केट समोरील दोन एकत्र येणाऱ्या रस्त्यांच्या मध्यभागी अनेक महिन्यांपासून पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्यात आले.
अनेक हे वेळा खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे करून सुद्धा खड्डे बुजवले गेले नव्हते. त्यातल्या एका खड्ड्यामुळे अनेक लहान मोठ्या वाहनांचे त्याचबरोबर दुचाकीस्वारांचे छोटे मोठे अपघात होऊन त्यामध्ये अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक गंभीरित्या दुखापत होऊन जखमी झाले होते. यावर तेथील व्यापारी व स्थानिक वाहन चालक व मुटकेवाडी येथील व परिसरातील रहिवाशी नागरिकांनी चाकण गावचे माजी उपसरपंच व पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदासदादा वाडेकर यांच्याकडे खड्डे बुजवण्या करिता वाहतूक वर्दळीच्या रस्त्यामध्ये पडलेले मोठे खड्डे बुजवण्याची मागणी केली. यावर लगेचच कालिदासदादा वाडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे विभाग कार्यकारी अभियंता अधिकारी व पुणे-नाशिक रस्ते महामार्ग विभागाचे समन्वयक दिलीप मेदगे यांच्याकडे संपर्क करून चाकणकर नागरिकांचे त्या रस्त्यावर होणारे वारंवार अपघात व त्या अपघाती रस्त्याची गंभीर समस्या मांडून अतितात्काळ रस्त्यात पडलेले अपघाती खड्डे बुजवण्याची मागणी केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व समन्वयक दिलीप मेदगे यांनी कालिदासदादा वाडेकर यांनी केलेल्या मागणीची तत्परतेने दखल घेऊन मच्छी मार्केट समोरील रस्त्यामध्ये पडलेले मोठे अपघाती खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरण करण्यात आले. त्यावर चाकणकर व मुटकेवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लगेचच पाठपुरावा करून दादांच्या पुढाकाराने त्वरित दखल घेऊन काम झाल्यामुळे, चाकण गावचे माजी उपसरपंच कालिदासदादा वाडेकर, पुणे-नाशिक महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे व सार्वजनिक बांधकाम पुणे विभाग यांचे चाकणकर नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.