युवराज डोंगरे/खल्लार
2005 नंतर नोकरीला ला गलेल्या कर्मचा-यांना, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही .
जुनी पेन्शन लागू होण्याकरीता जुनी पेन्शन हक्क संघटना शिक्षकांना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन या मागणी करता सातत्याने संघर्ष करत आहे. शासनाने नवनियुक्त 2005 नंतरच्या सर्व कर्मच्यार्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेने सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेला व आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहे. दिनांक 25 ते 27 डिसेंबर दरम्यान हे आंदोलन हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर होत आहे.
शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याकरीता अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ सतत आंदोलन करत आहेत. नुकतेच ऑगस्ट 2022 ला राष्ट्रपतींना पेन्शन बहाली करिता स्वाक्षरी आंदोलन चे निवेदन पाठवण्यात आले.
सप्टेंबर 2022 ला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन संघटनेतर्फे राज्यभर करण्यात आले होते. यापूर्वीसुद्धा तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जुन्या पेन्शन करीता आंदोलन करण्यात आले होते.
निरंतर आंदोलनातून संघटनेच्या मागणीला यश येईल असा विश्वास अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघास आहे. दिनांक 25 ते 27 डिसेंबर दरम्यान पेन्शन मार्च व आत्मक्लेश आंदोलनाकरिता राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांना आंदोलनास सक्रिय उपस्थित राहण्याबद्दल संघटनेतर्फे कळविण्यात आलेले आहे.
देविदासजी बस्वदे राज्य अध्यक्ष, कल्याणजी लवांडे राज्य सरचिटणीस, अण्णाजी आडे राज्यकार्याध्यक्ष, किरणजी पाटील विदर्भ विभाग प्रमुख, यांचे स्वाक्षरीने पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. असे अमरावती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सूरज मंडे यांनी कळविले आहे.