नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली शाखेमध्ये दिनांक २३ डिसेंबर २०२२ ला नागपुर विभागीय प्रमुख प्रणयकुमार यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर विभागातील प्रत्येक शाखा कार्यालयात अभिकर्त्यांसाठी नवीन पॉलिसी करण्याबद्दल पॉलिसी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये साकोली शाखेतील ८०० अभिकर्त्यानी या स्पर्धेत भाग घेतला. त्यात पुजा कुरंजेकर यांच्या समुहामधील सर्वात कार्यक्षम कुशल नवीन महिला अभिकर्ता अर्चना उके यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केले त्यामुळे साकोली शाखेचे शाखाधिकारी कलमकर यांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीमधे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साकोली शाखेचे सहाय्यक शाखाधिकारी किशोर डोंगरे, चंदु लिखार, तसेच शाखेतील अन्य कर्मचारी वर्ग व अभिकर्ता याप्रसंगी उपस्थित होते. यात अर्चना उके यांनी विमा क्षेत्रात मागील ८ महिन्यापासून जे उल्लेखनीय कार्य केले त्यांच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले. अर्चना उके यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या समुह नेतृत्व पुजा कुरंजेकर यांना दिले आहे. तसेच साकोली शाखेत नवीन अभिकर्त्याना योग्य ते मार्गदर्शन करून अभिकर्त्यांचा उत्साह वाढविण्याचे महत्त्वपुर्ण कार्य साकोली शाखेचे सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे हे करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे नवीन अभिकर्त्यांना स्वतःचा व्यवसायात प्रगती करण्यास मदत होते. साकोली शाखेत नवीन अभिकर्त्याचा सत्कार झाल्याने साकोलीत अर्चना उके यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com