निरा नरसिंहपुर दिनांक: 24
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
गिरवी तालुका इंदापूर येथील आखंड हरिनाम व गाथा पारायण सोहळा काल्याच्या किर्तनाने समाप्त झाला .
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांचे गिरवी येथील आखंड हरिनाम सप्ताहामधे काल्याच्या कीर्तनानी सांगता झाली.
किर्तन रुपी सेवेत गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज पुढे बोलत आसताना म्हणाले की,, सप्ताह मधील काला हे आनंदाचा रस आहे. भाग्यवान आसाल तरच काल्याचा रस मिळतो. ज्या ठिकाणी काल्याचे किर्तन आहे त्या ठिकाणी साक्षात भगवंतच उभा आसतो.
गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलत होते,
गुरुवर्य सोहम महाराज देहुकर (मळवली) यांच्या मार्गदर्शना खाली व
गिरवि पंच क्रोशीतील आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सर्वच समस्त ग्रामस्थ व भाविक भक्त , तसेच ह-भ- प अंकुश रणखांबे महाराज यांच्या सहित सर्वांच्या सहकार्याने आखंड हरिनाम सप्ताहाचा शेवट झाला.
आजी, माजी सरपंच उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या वतीने ही संपूर्ण अन्नदान सेवा आठ दिवसाचे नियोजन करण्यात आले होते.अखंड हरिनाम सप्ताह साठी, टाळकरी विणेकरी मृदुंग वादक, व ऐंकणारे भाविक श्रोते आणि भजनी मंडळ वारकरी तसेच महिला भगिनी बहुसंख्येने सर्व भागातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सप्ताहासाठी सालाबाद प्रमाणे मंडप व डेकोरेशन साठी विठ्ठल गायकवाड गणेशवाडी तर आचारी चिंतामणी कुंभार यांचे नेहमीच सहकार्य आसते.असे ह भ प रणखांबे महाराज यांनी सांगितले
शेवटी काल्याचा महाप्रसाद घेऊन कीर्तनाची सांगता झाली.