प्रितम जनबंधु

संपादक 

 

बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधिमंडळावर बसपाचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉक्टर अशोक सिद्धार्थ व प्रदेशाध्यक्ष अड संदीपजी ताजने यांच्या नेतृत्वात आज इंदोरा येथून एका भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. 

या मोर्चात महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी ऍड सुनील डोंगरे, प्रशांत इंगळे, हुलगेश चलवादी, मनीष कावळे तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आप-आपल्या कार्यकर्त्यासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

हा मोर्चा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती, महापुरुषांची स्मारके, भूमिहीन शेतकरी, शेतमजूर, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी श्रमिक, विद्यार्थी, युवा, बेरोजगार, शिक्षण, आरोग्य, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी होता.

या मोर्चाकरांच्या स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, यशवंत स्टेडियम शेजारच्या पटवर्धन मैदानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक व आंतरराष्ट्रीय शोध केंद्र बांधावे, अंबाझरी उद्यान शेजारी 20 एकड जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी करावी, मान्यवर कांशीराम टी पॉइंट व कांशीराम मार्गाला कांशीराम मेट्रो स्टेशनचे नाव द्यावे, रहाटे कॉलनी चौकाला दीक्षाभूमी चे नाव, वर्धमान नगरातील स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेट्रो स्टेशन नाव, मुंबईच्या दादर येथील इंदू मिलच्या जागेवर विनाविलंब डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनवावे, भूमीहीनांना गायरान वन, झुडपी च्या शासकीय जमिनी मिळाव्या, बेघरांना घर मिळावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, अतिवृष्टीचे पैसे मिळावे, आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, पीक विमा योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ, भीमा कोरेगाव दंगलीतील निरपराधांवरील गुन्हे रद्द करा, गुन्हेगारावर गुन्हे दाखल करा, ॲट्रॉसिटीच्या केसेस मधील दिरंगाई बंद करा, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती द्या.

 

ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा, एससी, एसटी, ओबीसी च्या नोकरीतील अनुशेष पूर्ण करा, दलित वस्ती व शिष्यवृत्ती मधील शासकीय भ्रष्टाचाराची चौकशी करा, अंगणवाडी सेविकांना न्याय, ग्रामीण मधील शिक्षण व आरोग्य ह्याकडे विशेष लक्ष द्या, SC/ST/OBC ना केजी ते पीजी पर्यंतचे सर्व शिक्षण मोफत द्या, सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सोई द्या, जनतेतून थेट सरपंच- नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया रद्द करा, महापुरुषांचा अवमान करणारे राज्यमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राजनेत्यावर कार्यवाही करण्याचा कायदा बनवावा. शिवाजी पार्क दादर येथील पोलीस अधिकारी सतीश कसबे, मनोज पाटील, कासार यांचेवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावे आदि 35 मागण्या होत्या.

 

या मोर्चात संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. बहुजन समाज हा मागणारा नव्हे तर देणारा समाज आहे हा विश्वास समाजात निर्माण करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून येणाऱ्या निवडणुकीत बसपा बॅलन्स ऑफ पावर निर्माण करून महाराष्ट्रात देणारा समाज बनेल असा विश्वास बसपाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजणे यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

 

मोर्चेकर्यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉक्टर अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजने, प्रदेश प्रभारी ऍड सुनील डोंगरे, प्रशांत इंगळे, हुलगेश चलवादी, मनीष कावळे, प्रदेश महासचिव नागोराव जयकर, दादाराव उईके, अभिषेक कुंथल यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला भेटायला विधिमंडळात गेल्यावर मुख्यमंत्र्यांच्या वतीने उद्योगमंत्री उदय सावंत यांनी सभागृहा बाहेर येऊन बसपाचे निवेदन स्वीकारले

 

मोर्चाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पदाधिकारी रंजनाताई ढोरे, उत्तम शेवडे, पृथ्वीराज शेंडे, संदीप मेश्राम, विजयकुमार डहाट, मीतीन शिंगाडे, समाधान कांबळे, जितेंद्र घोडेस्वार, राजू चांदेकर, संजय जयस्वाल, शादाब खान, महेश सहारे, प्रिया गोंडाने, प्रताप सूर्यवंशी, मोहम्मद इब्राहिम, वैशाली नारनवरे, सुरेखा डोंगरे, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, विकास नागभिडे, गौतम पाटील, चंद्रशेखर कांबळे, अभिलेश वाहने आदींनी विशेष परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News