भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले व दूधमाळा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले मौजा परसवाडी गाव हे रावण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम गोंडी धर्म प्रचार प्रसार केंद्र या गावात आहे.
परंतु या गावाला जाण्यासाठी वीस वर्षांपूर्वी खडीकरणाचा रस्ता बनवला होता.आजच्या स्थितीत त्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले असून,रस्त्यावरचे दगड उखळेलेले आहेत.
गावातील नागरिकांनी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत कार्यालयाला पत्रव्यवहार केला आहे व निवेदन दिले आहेत.तसेच जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांना सुद्धा निवेदन दिले आहेत.
परंतु अजून पर्यंत तो रस्ता दुरुस्त झालेला नाही.निघालेल्या दगडामुळे नागरिकांना रहदारी करण्यास त्रास होत आहे.याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्ता डांबरीकरण करावे अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून दिली आहे.
यावेळी निवेदन देताना गावातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोरेटी,आशिष पोरेटी,विकास हलामी,अमित पोरेटी,हिरामण तुलावी,विश्वावराव उसेंडी,प्रल्हाद हलामी,राजेंद्र नरोटे व गावातील अन्य नागरिक उपस्थित होते.