
प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जिल्हास्तरावर जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी सांस्कृतिक सभागृह, नगर परिषद, बल्लारपूर येथे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत करणे याकरीता युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तसेच सदर युवा महोत्सव हा जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजीत करण्यात येत असतो.
सन 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषित केले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे.
या संकल्पनेवर आधारीत जिल्हास्तरावर युवा महोत्सवात सहभागी युवकांच्या कला प्रकारानुसार स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारीअविनाश पुंड यांनी कळविले आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये समाविष्ट असलेले कलाप्रकार
1) सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, 2) समूह लोकनृत्य, 3)वैयक्तिक सोलो लोकनृत्य, 4) लोकगीत, 5) वैयक्तिक सोलो लोकगीत.
कौशल्य विकास मध्ये
1) कथाकथन, 2) पोस्टर स्पर्धा, 3) वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), 4 फोटोग्राफी.
संकल्पना आधारीत स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी
1) तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, 2) सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान. युवा कृती कार्यक्रमाअंतर्गत 1) हस्तकला, 2) वस्त्रोद्योग,3) ॲग्रो प्रोडक्ट या प्रकाराचा समावेश आहे.