बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
काझड येथे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नीरा- भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्यात मृत्यूमुखी पडलेल्या रतिलाल नरुटे व अनिल नरुटे या 2 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची गुरुवारी (दि.23) भेट घेऊन सांत्वन केले.
इंदापूर तालुक्यातील काझड हद्दीत निरा-भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्यात बुधवारी (दि. 22 ) सायंकाळी पडून दुर्दैवाने या 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा या शेतकऱ्यांचे मृतदेह सापडले, त्यानंतर आज गुरुवारी सकाळी या शेतकऱ्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, काझड येथील भेटी प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी काझडचे माजी सरपंच सुनील शिवाजी पाटील यांच्या दीर्घ आजाराने झालेल्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन सांत्वन केले.