
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-
अपघातात दोषी नसतांना कार चालकाला पैसे मागून नाहक त्रास दिल्या प्रकरणी कन्हान पोलिस स्टेशन येथील दोन पोलिस अधिकारी व एका कर्मचाऱ्याला कर्तव्यात कसूर केले या अहवाला नुसार तिघांची जिल्ह्यातील इतर ठिकाणी बदली करण्यात आली.
ए.एस.आय.गणेश रमेश पाल,श्री.सदाशिव काठे व नायक पोलिस शिपाई महेंद्र जळतीकर अशी बदली करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कन्हान पोलिस स्टेशन हद्दीतील महामार्ग क्रमांक 44 वर अपघातामध्ये एमपी 20,बीए 7850 या चार चाकी वाहनाला दुचाकी क्रमांक एमएच 40,आर 6595 ने धडक दिली होती.
अपघात प्रकरणातंर्गत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चार चाकी वाहन मालक श्री. रणमत नंहुलाल मडावी रा.मध्यप्रदेश यांच्याकडून वाहन सोडण्याच्या नावाखाली बळजबरीने,परिचित व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन पैशे टाकण्यात बाध्य केले होते.मात्र चारचाकी वाहनधारकांचा अपघात प्रकरणातंर्गत कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता.
तरीही वाहन चालकाने उदनिर्वाहचे साधन भेटणार या करिता त्या व्यक्तीच्या खात्यात फोन-पे द्वारे ऑनलाईन 8000 रुपये 16 ऑगस्टला 2023 टाकले.
मात्र आणखी पैसे मिळविण्या साठी सलग दोन महिने वाहन चालकाला मानसिक व शारीरिक त्रास देण्यात आले.तर इतर तपासी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली वाहनावर कुठलाही गुन्हा दाखल नसताना वाहन ठाण्यात ठेवले.
या प्रकरणात दोषी पोलिस अधिकारी गणेश पाल,सदाशिव काटे व महेन्द्र जळितकर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी कन्हान पोलिस स्टेशन ठाणेदार सार्थक नेहते यांना निवेदनातून केली होती.
निवेदन देताच पोलिसांनी वाहन मालकाला वाहन सोपविले.या प्रकरणाची पारदर्शी चौकशी होणार असल्याचे आश्वासन ठाणेदार सार्थक नेहते यांनी दिले होते.