उमेश कांबळे ता प्र भद्रावती-
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै.निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे तरुणांना पोलीस भरती संदर्भात माहिती प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून एकदिवसीय पोलीस भरती कार्यशाळेचे आयोजन दि 24 या ला करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भद्रावती येथील पेटकर अकॅडमी संचालक पेटकर यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिति होती. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. विवेक शिंदे भद्रावती शिक्षण संस्था,भद्रावती, तर प्रमुख पाहुणे डॉ. कार्तिक शिंदे सचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य पियुष लांडगे, तसेच यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्याल भद्रावतीचे प्राचार्य डॉ. जयंत वानखडे आणि यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशांत पाठक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली व सूत्र संचालन प्राध्यापक प्रमोद पाठक यांनी केले.
आधुनिक काळात प्रत्येक तरुण युवकाला स्पर्धा परीक्षासाठी तयारी कशी करावी,अभ्यासक्रम कोणता आहे आणि पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करताना शारीरिक चाचणी व मैदानी खेळ, गणित विषयाची तयारी याबाबत वक्ते यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्येक तरुण युवकांनीआपल्या जीवनात चांगली नोकरी कशी प्राप्त करावी या दृष्टिकोनातून अभ्यास आणि अभ्यासाची पद्धती यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विवेक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक प्रशासकीय अभ्यासक्रमाचा नवीन शैक्षणिक पद्धतीचा उपयोग करून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत डॉ.कार्तिक शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. डॉ. जयंत वानखडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरती या अभ्यासक्रमाबाबत जिज्ञासा वृत्ती निर्माण करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमचे आभार प्रदर्शनाने प्राध्यापिका सीमा बोभाटे यांनी केली. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे बहुमूल्य योगदान मिळाले.