सावली (सुधाकर दुधे)

 

     देशभरात 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून केंद्र व राज्य सरकार द्वारे विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.त्यामुळे या निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानावर.विविध चर्चासत्रे, परिसंवादाच्या. माध्यमातून भारतीय संविधान जनमानसात समजावून सांगितले जाते, त्याचाच एक भाग म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचा 26 वा वर्धापन दिन आणि संविधान .दिनाचे औचित्य साधुन आकाशवाणी चे निवेदक तथा सुप्रसिद्ध गायक आणि संच यांचा बहारदार गीतगायनाचा कार्यक्रम समाज मंदिर सावलीच्या भव्य. पटांगणात आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी पालकमंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आम .विजय वड्डेटिवार तर अध्यक्षस्थानी संदीप गड्डमवार, तर प्रमुख आतिथी रामभाऊ मेश्राम, सावलीच्या नगराध्यक्षा सौ .लताताई लाकडे, माजी नगराध्यक्ष विलास भाऊ यासलवार,न.प सावली चे उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार,मोतीलाल दुधे ,अड आदर्श गेडाम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे..

  ग्रंथालये हि ज्ञानाची केंद्र बनावित.,शालेय ,महाविद्यालयीन शिक्षणाच्या व्यतिरिक्त ग्रंथालयाच्या ज्ञान,केंद्रातुन ,अभ्यासिका केंद्रातील विविध पुस्तक ,ग्रंथाच्या वाचनातुन ज्ञानात भर पडते व वाचन,ज्ञान माणसाच्या दैनंदिन जिवनात ,पुढील वाटचालीत महत्वाची भुमिका बजावत असते ,सावली सारख्या गावात सुभेदार रामजी आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती करण्यात आली.गेली अनेक वर्षांपासून सदर वाचनालयाची योग्य वाटचाल सुरू आहे , सदर वाचनातुन अनेक शालेय विद्यार्थी ज्ञानसंपदा ग्रहण करीत आहेत.

    या वाचनालयाची 26 वर्षाची यशस्वी वाटचाल पुढेही अशीच भरभराटीस यावी या उदात्त हेतुने वाचनालयाचा 26 वा वर्धापन दिन तथा संविधान दिनाच्या निमित्ताने गायक हेमंत शेंडे आणि संच यांचा गीतगायनाचा संगितमय नजराणा आयोजित केला आहे, तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या बहारदार संगीतमय नजराण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक चंद्रकांत गेडाम, बाबा मेश्राम, सुधाकर दुधे ,प्रितम गेडाम, गौतम थोरात, लोकमत दुधे,योगेश गेडाम यांनी केले आहे..।।

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com