रासेयो स्वयंसेवकानी समजून घेतली निवडणूक प्रक्रिया..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर /- गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविदयालय चिमूर येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी चिमूर तहसिल कार्यालयास भेट देऊन सदर निवडणूक प्रक्रिया अंतर्गत मतदान कसे करावे,आपले नाव जर मतदार यादीत आले नाही तर काय करायला हवे याबाबत माहिती जाणून घेतली.

         तहसिल कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रकियेतील कामाचे स्वरूप,नियोजन या विषयी माहिती घेतली. 

          तसेच या प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री. किशोर घाडगे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.मतदानाचे महत्व समजून सांगितले.युवकानी आपल्या कुटूंबाला समाजाला मतदानासाठी प्रेरित केले पाहीजे, मतदानाची टक्केवारी वाढली पाहीजे असे सांगितले.

         या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांचे मार्गदशन लाभले होते.सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे यांनी केले. 

       आभार रासेयो स्वयंसेवक श्री.समिर आत्राम यांनी मानले.या वेळी सहभागी विद्यार्थ्यानी सक्रीय सहभाग घेतला होता.