मिलींद वानखडे
मुंबई
गांवगाड्यातील अठरापगड जाती जमातींना तसेच इतर धार्मिक अल्पसंख्यांकांना सोबत घेऊन वडीलकीच्या नात्याने सत्ता राबवायची आहे की,सनातनी-मनुवाद्यांच्या ती हवाली करून त्यांची मांडलिकी पत्करायची आहे यावर मराठा समाजाने गांभीर्याने विचार करुन येणा-या विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे.
2019 साली भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या 105 आमदारांमध्ये किती मराठा आमदार होते आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वालाच धक्का बसण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली,तेव्हा हे मराठा आमदार काय करीत होते हे दिसून आले नाही.
श्री.उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडणा-यांमध्ये तसेच त्यानंतर झालेल्या एका मोठ्या पक्षफुटीमध्ये सुद्धा मराठा आमदारच जास्त होते हे दिसून येते.
अशा परिस्थितीत सत्ताधा-यांच्या थातुरमातुर घोषणांना बळी न पडता तसेच इतर किरकोळ पक्ष-आघाड्यांच्या नादी न लागता महाराष्ट्रातील मतदार संपूर्ण महाराष्ट्राच्या भल्यासाठी मतदान करेल व महाराष्ट्रधर्माची परंपरा कायम ठेवेल अशी आशा बाळगणे गैर ठरू नये.
सेना तोडून सुद्धा आघाडी ची तुतारी वाजेल याची शाश्वती नाही…