मिलींद वानखडे
मुंबई
तब्बल 34 वर्षांनंतर शैक्षणिक आराखडा बदलणार आहे.हा शैक्षणिक आराखडा उच्च शिक्षित,शिक्षित तज्ज्ञांकडून व लोकांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार बनविला असणार हे नक्कीच आहे.
हा शैक्षणिक आराखडा पुढील वर्षापासून यदाकदाचित लागू होईल.2030 पर्यंत या शैक्षणिक आराखड्यातील शैक्षणिक उद्दिष्ट्ये साध्य होतील किंवा नाही काही माहित नाही.
परंतु आज शिक्षणाचे खाजगीकरण करून बहुजनांच्या शिक्षणावर गदा आणण्याचे काम मात्र सुरळीतपणे चालले आहे.
आम्ही मात्र मराठा,धनगर,लिंगायत,माळी,वंजारी,ब्राह्मण,आदिवासी,हिंदू,इस्लाम,ख्रिश्चन,शिख,इसाई, इत्यादी…
आम्हीच ग्रेट म्हणून एकमेकात भांडत बसून माणुसकीला काळिमा फासत चाललो आहे.याचा पद्धतशीर फायदा राजकीय धुरंधर घेत आहेत.काही बदमाश लोकांच्या साह्याने…
आज सर्वसामान्यांना जगणेच मुश्किल झाले आहे. त्यात शिकून मोठे व्हावे तर शिक्षणाच्या खासगीकरणातून व इंग्रजी शाळांच्या फॅडातून लोकांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर करण्यासाठी व वंचित ठेवण्यासाठी खुप मोठे … स्लो पॉयझनचे षडयंत्र रचले जात आहे.
आज समाजात सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड मोठी बौध्दिक क्षमता आहे.परंतू बेताच्या आर्थिक स्थितीमुळे अनेक मुलामुलींना आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागत आहे.
आज एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाने ठरविले की मला एम.बी.बी.एस.बनायचे आहे.त्याच्याकडे बौद्धिक क्षमता प्रचंड आहे.परंतू आर्थिक क्षमता नाही.एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी.अनेक गरीब व होतकरू मुलांच्या डाव्या हाताचा मळ आहे.
परंतू आर्थिक रसदच उपलब्ध नसल्याने त्यांची स्वप्ने दिवा स्वप्नेच राहू लागली आहेत.
योगायोग विधानसभा 2024 निवडणुका जाहीर झाल्या आहेत.युत्या व आघाड्या करून महाराष्ट्राचे कधी नव्हे तर पुढील पाच वर्षांत आम्ही नंदनवन करू अश्या पोकळ डरकाळ्या फोडल्या जातील.या जातीला हे देऊ …त्या जातीला ते देऊ….हा धर्म वाचवू व तो धर्म संकटात म्हणून बोंबाबोंब मात्र केली जाईल…..हे तुमचा राजकीय करीअर भाग म्हणून तुम्ही करा…..
पण जाता जाता …. तुमच्या सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यात एक उल्लेख जरूर करा….
महाराष्ट्रातील सर्वसामान्य,हुशार,होतकरू मुलांंचे शैक्षणिक पालकत्व आमचा आमदार व खासदार आमची सत्ता आली नाही तरी घेईल….
मुलींसाठी फ्री शिक्षण ही घोषणा न करता… तीला जगता तरी यावे म्हणून…अन्न,वस्त्र व निवारा या पायाभूत सुविधाही आमचे सरकार उपलब्ध करून देईल…तेथे जात धर्म पाहिला जाणार नाही…
आम्ही छत्रपती शाहू महाराज,सयाजीराव गायकवाड,कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा फुले दांपत्य, डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत…हे एकदा संपूर्ण महाराष्ट्राला,भारताला नव्हे तर जगाला दाखवून द्या.
हाच तो पुरोगामी महाराष्ट्र गोरगरीब मुलांच्या व मुलींच्या शिक्षणासाठी काळजी घेतो.पैशाच्या अभावामुळे एका जरी मुलाने किंवा मुलीने शाळा,काॅलेज अर्ध्यावर सोडून दिले किंवा समाज कंटकाच्या जाचाला कंटाळून शाळा सोडली किंवा आत्महत्या केली तर…
आम्ही सत्ताधारी व विरोधक तेवढेच जबाबदार असेल…
त्या विषयाचे राजकारण न करता… संविधानिक न्याय… मिळवून देण्यास आम्ही अपयशी ठरलो तर राजकीय संन्यास घेऊ…
ही भिष्मप्रतिज्ञा आमचे सर्व नेते मंडळी घेतील काय?…..
***
विधानसभा 2024….
सामान्यांना न्याय हीच खरी खुरी आमची प्रतिज्ञा..
लढ…
शिक्षणाचे खाजगीकरण थांबव..
रोजगार मिळावं…
शैक्षणिक आधार…
विनातारण कर्जपुरवठा…
आम्ही होतकरू आम्ही हक्कदार…
शिक्षण पक्के…एकदम ओक्के..
आम्ही पांग फेडू…