अडीच वर्षांपूर्वी अलीबाबा 40 चोरांनंतर सत्तेत सोबत आलेल्या मिस्टर नटवरलाल (विसाव्या शतकातला बिहारचा ठग ज्याने, ताज महाल, संसदभवन, राष्ट्रपती भवन विकले होते) याने 70, 000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा सिंचन प्रकल्पच एका रात्रीतून गायब करून पवित्र झाला आणि निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणीसाठी मुद्रांक शुल्क 100 /- वरून 500/- वर नेला. तसेच सोयाबीन तेलाचे भाव 100/- वरून 135 /- वर नेले…….!
जर त्या 70, 000 कोटी रुपयातून किंवा 50 खोके सबकुछ ओके मधून या लाडक्या बहिणीचे प्रेम अडीच वर्षापूर्वी उतू गेले असते, तर बरे झाले असते.
लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा…….
आमच्या मताची किंमत ही आमच्या जिवापेक्षाही मोठी आहे. त्याची तुलना पैश्यात तर करूच शकत नाही. उलट त्या मताच्या अधिकाराला मिळविण्यासाठी अमेरिका सारख्या लोकशाहीवादी देशातील महिलांना स्वातंत्र्यानंतर सुमारे 190 वर्ष वाट पहावी लागली……..!!!!
इथे तर घटनाकाराने शुद्रापेक्षाही हीन लेखलेल्या मनुस्मृतीला जाळून ( जी परंपरा पाऊणे चार हजार वर्षांपासून चालत आली होती ) स्वातंत्र्यासोबतच संविधानातून महिलांना हा मतदानाचा हक्क मिळवून दिला…..
घटनाकाराचे मत असेही होते आणि ते 100% खरेही होते की, जर हजारो वर्षापूर्वीपासून ही भारतीय स्त्री स्वतंत्र असती……….
तर कदाचित या देशावर परकीयांचे एवढे आक्रमण झालेच नसते……!
एवढा त्याग, संघर्ष, समर्पनाची शक्ती पुरुषांच्या तुलनेत जर आमच्या माता, भगिनी मध्ये आहे, तर मग आमच्या माता, भगिनी कदापि या लाडक्या भावाच्या खोट्या लाडक्या 7500 /- रुपयाच्या खोट्या उसण्या प्रेमाला कधीही भाळून आपले मत त्यांच्या पदरात टाकणार नाही. याची पुरेपूर ती काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही.
तसे जर नाही केले तर जरी निवडणुकीनंतर कोणाचेही सरकार येवो, मग ते देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, किंवा याच पक्षाचा कोणताही मुख्यमंत्री जरी झाला, तरी सुद्धा ही योजना चालवू शकणार नाही.
जर त्यांनी अंतःकरणातून ठरवलेच तर त्यांच्या स्वतःच्या वयक्तिक संपत्तीतून ते पाच वर्षे करू शकतात. एवढी त्या सर्व आमदार आणि मंत्र्यांकडे कडे संपत्ती आहे.परंतू , ते तसे करणार नाहीत. कारण त्यांना अंतःकरण नाही. कारण त्यांच्याकडे हृदय नाही. तुम्ही कधीतरी ऐकलंय का? की एखाद्या राजकारण्याचा अंत हृदयविकाराच्या झटक्याने झाला म्हणून….!
कारण यांना हृदयच नसते.
म्हणून माझ्या तमाम महाराष्ट्रीयन माता भगिनींनो या 7500 /- रुपयापेक्षा कितीतरी पटीने मोलाचा मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे ते अनमोल आहे…….!
हा मताचा अधिकार योग्य विचार करुन संविधान विरोधी शक्तीला कायमचे नष्ट करण्यासाठीच वापर करा…….
ही लाडकी बहीण योजना निवडणूकिनंतर बंद का होणार याचे मुख्य कारण हे की, आज दि. 24/10/2024 गुरुवार रोजी महाराष्ट्रावर एकूण पाऊणेनऊ लाख कोटी रुपयाचे कर्ज आहे. आणि निवडणुकीनंतर जे सरकार येईल त्या सरकारला कमीत कमी 2 लाख कोटी रुपयाचे कर्ज काढावे लागेल, तेंव्हा कुठे केवळ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार होऊ शकतो. अशी जर महाराष्ट्राची आर्थिक अवस्था असेल तर, लाडकी बहीण कडकी होणार नाही कशावरून……?
म्हणून या लाडक्या बहिणींनो विचार करुन मतदान करावे….
आवाहनकर्ता आणि जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689