दखल न्यूज भारतचे संपादक प्रितम जनबंधू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने….. — एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व,तद्वतच कर्तव्यतत्पर,मनमिळाऊ स्वभावाचे धनी आणि अफलातून पत्रकार….

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

              वृत्त संपादिका 

      आपल्या निस्वार्थ व कर्तव्यदक्ष जबाबदारीवर ठाम राहुन अनेक शिखरे पादाक्रांत करणारे,पत्रकारितेतील दांडगा अनुभव जोपासत निर्भीड कार्यप्रणालीतुन आपली छाप पाडणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व तद्वतच शांतीप्रिय कृतीशील मनोधर्याचे धनी तद्वतच एक पत्रकार ते संपादक असा पत्रकारितेतील खडतर प्रवास पार करुन आपली प्रगत ओळख निर्माण करणारे दखल न्यूज भारतचे संपादक आ. प्रीतम जनबंधू यांचा आज वाढदिवस ..!

        संपादक आ.प्रीतम जनबंधू सर यांचा जन्म आरमोरी तालुक्याच्या ठिकाणाहून 30 किमी अंतरावर अगदीच शेवटच्या टोकावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नरचुली सारख्या जेमतेम लोकवस्ती असलेल्या खेडे भागात झाला.

       ग्रामीण भागातील वातावरणात जन्म होऊनही त्यानी बाहेर पडुन आपले शिक्षण पूर्ण केले आहे.एका शेतकरी कुटुंबात जन्म,घरची परिस्थिती हलाखीची असली तरी अनेक खडतर प्रवास व कठीण प्रसंगाना चिरत आपल्या प्रगतीची पाउलवाट स्वत: तयार केली असुन,त्या खडतर वाटेवर यशस्वी वाटचाल अनवरत अगदीच निरागसपणे करीत असल्याचे पावलोपावली जाणवते आहे. 

        संपादक प्रीतम जनबंधू सर यांनी कर्तव्यदक्ष,सहनशील व खंबीर नेतृत्व साकारत,”आड येणाऱ्या अनेक खडतर परिस्थितीवर मात करुन अनेक यशाचे शिखर प्राप्त केले आहेत आणी आपल्या शुल्लकशा जिवणप्रवाहाला गती दिली आहे.

     “शिखरे यशाची आपण अशीच चढत राहावी,कीर्ती तुमची असीच आसमंतात पसरत राहो!…

     विजयाची ललकारी तुमची दाहीदिशा गुंजत राहो,वाढदिवस आपला असाच आनंदात जावो!…

        पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्व,तद्वतच अभूतपूर्व लिखाणाच्या जोरावर आपला प्रभाव कायम ठेवत जनमानसात आपली आगळीवेगळी छबी निर्माण केली आहे.

        त्यासोबतच निस्वार्थ भावनेचा अंगीकार करुन पत्रकारीता कसी असायला हवी,पत्रकारिता करताना कोणकोणत्या बाबी कशाप्रकारे हाताळल्या जाव्यात.बातमी संकलीत करताना ते कशारितीने संकलीत करावी याची इत्यंभूत माहीती कशी प्राप्त करता येईल यासाठी संपादक आ.प्रीतम जनबंधू सर यांची कार्यपद्धत व प्रेरणा उल्लेखनीय ठरावी असीच आहे. 

     “इतरांसाठी सर्वकाही करतात पण स्वतः साठी देखील काही करावे हे ते विसरतात…खरंच तुमच्यासारखे आदरणीय व्यक्ती जगात खूप कमी भेटतात….”

       आरमोरी तालुक्यातील अगदीच शेवटच्या टोकावर चाडीस पन्नास घराची लोकवस्ती असलेल्या डोंगरांच्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नरचुली सारख्या छोट्याशा अतिदुर्गम भागात जन्म झालेला प्रखर विचारशील समाजमनाचे हित जोपासनारा,सहनशील आणि उज्वल भविष्यावर ताकद पणाला लाऊन अनेक यश संपादन करणारा,अष्टपैलुत्व व प्रभावशाली नेतृत्व साकारनारा तद्वतच नशीबवान म्हणुन भाग्याची शिदोरी सोबत घेऊन आलेला एक विचारशील योद्धा संपादक प्रीतम जनबंधू सर यांना अवघ्याच काही दिवसात अनेक भाग्योदय प्राप्त झाले आहेत.

         शिवाय त्यानी आपल्या निस्वार्थी,निर्भीड,कार्य कर्तृत्वाच्या जोरावर अनेक पारितोषिक मिळवित अभूतपूर्व यश संपादन केले आहेत.

        म्हणूनच आदरणीय सराच्या मौलवान कार्यकर्तृत्वाचा समर्पक वर्णन करणे औत्सुक्याचे ठरेल…त्याना अगनीत शुभेच्या पुढील पंक्तीतुन……

     “तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा,तुमचा आनंद गगनात न समावा!…

      असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो आणि तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा…!

      चंद्राच्या कोरिप्रमाणे आपलं आयुष्य असंच वाढत जावो!..”आपल्याला हवं ते सगळं मिळत जावो!…”जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस आपलीच कीर्ती गावो!…

       अगदीच अनेक कामासाठी असलेली तुमची तगमग,जिद्द,चीकाटी,त्यामागचे उचीत व यथायोग्य समर्पण खरोखर प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे.

       आणी तुमची निस्वार्थ प्रेरणा संकटाच्या वेळी मला शक्ती प्रदान करीत असते.बातमीतील अमर्याद शब्दरचना वाचकांना अगदीच काव्यसंग्रह वाटावी अशाच शब्द शैलीत असते. 

          सरांचे लिखाण म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारची शब्दसंपत्ती सारखीच आहे.आपन खरच माझे आदर्श ठरावे असीच आपली कार्यपद्धत आहे प्रथमतः माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……

      पत्रकारिता करित असतांना त्यांच्या बातम्यांमुळे आ.प्रीतम जनबंधू सर अगदीच कुणालाही खटकतात,बोचतात,अनेकांच्या मनात खुपतात.त्यामुळेच त्यांचे विषयी काहीच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत.

        अनेकजण आजही सरांची बातमी शब्द न शब्द कॉपी करताना दिसतात.अनेकानी प्रसंग साधून त्यांचा खच्चीकरण करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला आहे.

        पण ते डगमगले नाहीत तर अनवरत मार्गक्रमण करीत राहीले.आ.प्रीतम जनबंधू सरांनी आपला मनोधैर्य खचु दिला नाही.याउलट आपली प्रगत कार्यप्रणाली व कर्तबगार जबाबदारी सांभाळत अनेकांच्या ह्रदयात जागा मिळवली आहे.

       असा सोज्वळ व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करणारा अफलातून पत्रकार म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही अशीच सरांची विचारसरणी त्याच्या अभूतपूर्व लिखाणातुन दिसुन येतो आहे. 

      “एक व्यक्ती म्हणून नाही तर एक व्यक्तिमत्त्व म्हणून आयुष्य जगणारी व स्वतः ची तत्वे असणारी आणि तत्वांशी प्रामाणिक असणारी माणसे या जगात कमीच असतात.”

        संपादक प्रीतम जनबंधू सर यांची एकंदरीत कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरावी असीच आहे.नरचूली सारख्या एका छोट्याश्या खेड्यात शेतकरी व सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही अनेक संकटावर मात करुन खंबीर नेतृत्व जोपासत पत्रकारिता क्षेत्रात जनबंधू सर यांनी आपली छबी निर्माण केली आहे आणी आज दखल न्यूज भारतचे संपादक या पदावर कार्यरत राहुन महत्वाची जबाबदारी तत्परतेने पार पाडताना दिसुन येत आहेत.

        त्यांच्या या समाजहितोपयोगी मौलिक कार्याला तद्वतच खंबीर नेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्यानं मंगलमय मनोकामना व भरभरुन शुभेच्छा प्रदान करतो आहे.

        “येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा,

जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा….!

         मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे,प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे

आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभावे….!

      प्रितम जनबंधू सर यांचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत,अगदीच विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशीही अगदी जिवलगपने मैत्रीचा हात पुढे करुन ऋणानुबंधाचे एकनिष्ठ नाते जोपासणारे,आपल्या सहकारी मीत्रा विषयी संपादक प्रीतम जनबंधू सर यांच्या वैचारिक मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. 

       आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले संपादक…! 

                काही माणसं स्वभावाने कशीही का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,अशा माणसांपैकीच एक म्हणजेच प्रितम जनबंधू सर !

        सद्यस्थितीत प्रितम जनबंधु सर जि.प.प्राथमिक शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी वृत्त संकलनाचे कार्य तात्पुरते थांबवले असले तरी मात्र ते “दखल न्यूज भारत” परीवाराचे कायम सहकारी मित्र राहुन संपादकाची भुमिका पार पाडणार आहेत.

        आमचे स्नेही,परममित्र, दूरदृष्टी ठेवून कार्यप्रणालीचा अवलंब करून सारासार व समर्पक विचार लिखाणातुन मांडणारे उदयोन्मुख व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करनारे संपादक प्रीतम जनबंधू सर यांचे आयुष्य असेच सदोदित फुलत राहो,त्यांची वाटचाल सुजलाम् सुफलाम् होवुन अविरत प्रफुल्लित होत राहो,त्यांची अनवरत भरभराट होवो.त्यांना असेच घवघवीत यश मिळत राहोत अशी दखल न्युज भारतचे संपादकीय संचालक मंडळ तथा दखल न्यूज परीवाराकडुन मंगलमय मनोकामना…! 

      शिखरे उत्कर्षाची सर तूम्ही करीत रहावी,कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी….

     तुम्हा दिर्घ आयुष्य लाभो ही मनस्वी सदिच्छा,वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!..‌

🎂🎂🌷🌷🎂🎂🌷🌷🎂🌷🌷