गायत्री शक्तीपीठ समाजाला दिशा देणारे :- खा. मेंढे… — गायत्री शक्ती पीठाने अनेकांना दिली ऊर्जा….

प्रितम जनबंधु

  संपादक 

         भंडारा:- धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचे काम गायत्री शक्तीपीठ करीत आहे. या कामाचे भूमिपूजन करताना मला मिळालेले समाधान कितीतरी पटीने मोठे असल्याचे मत खा. सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.

            वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत खासदार विशेष निधीतून आज 23 रोजी भंडारा शहरातील प्रभाग 4 मधील गायत्री मंदिर परिसरात 50 लाख रुपये किमतीच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

          यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रामदास शहारे , संजय एकापुरे, भैरम काका, मुकेश थानथराटे, चेतन भैरम, रुबी चढ्ढा, सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोळकर, शैलेश मेश्राम, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर उपस्थित होते.

             देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व आघाड्यांवर देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील प्रत्येक नागरिक सुखी आणि समाधानी असावा हे त्यांचे ध्येय आहे. 

           गायत्री शक्तीपीठ लोकांना समाधानाचा मार्ग दाखविते. अशा संस्थेला माझा हातभार लागला, मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही खा. सुनील मेंढे म्हणाले.

             कार्यक्रमाला गायत्री शक्ती पिठाचे अनेक साधक उपस्थित होते.