सावली (सुधाकर दुधे)

 

     सावलीच्या दौरा प्रसंगी दिवाळी आनंद शिधा वाटपाचे व सांत्वन भेटी दरम्यान गडचिरोली कडे जात असतांना नवेगांव (मुरखळा) जवळ एका अज्ञात ट्रक वाहन चालकाने मोटारसायकल स्वारास धडक दिली.या धडकेत मोटारसायकल स्वार गंभीररित्या जखमी झालाय.रस्त्यांच्या बाजुला अचानकपणे खासदार नेते यांचे लक्ष गेले असता ड्रायव्हरला गाडी थांबण्याच्या सुचना केल्या व गाडीच्या खाली उतरले व घटनेची पाहणी केली.

     धडक दिलेला मोटारसायकल स्वारास डोक्याला मार लागुन रक्त जात असल्याने सदर अपघातग्रस्त व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेला बघुन तात्काळ गंभीर झालेल्या व्यक्तिस खासदार यांनी स्वतःच्या गाडीमध्ये उचलून त्या व्यक्तिस सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे स्वतः जाऊन भरती केले.

      लगेच खासदार अशोक नेते यांनी डॉ.अनिल रूडे जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन करून गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तिस तुरंत उपचारासाठी सुचना केल्या. तसेच वार्डामधील रुग्णांची विचारपूस सुद्धा या प्रसंगी करण्यात आली.

 

जखमी झालेला मोटारसायकल स्वार हा व्यक्ती विजय म्हशाखेत्री वय ४५ वर्षाचा असुन तो राहणार- मोखाळा, तालुका – सावली जिल्हा – चंद्रपूर येथील व्यक्ती आहे.

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मनीप्रमाणे माणूस द्या,मज माणूस द्या,असी भजनाद्वारे आर्त हाक जनतेला दिली होती.या भजनाचा प्रत्यय खा.अशोक नेते यांच्या प्रशंगवधनाने झाल्याचे निदर्शनास आले.”माणसाने माणुसकीचे जीवन जगायला पाहिजे,अशी शिकवण अपघातग्रस्त प्रसंगावरून खासदार अशोकजी नेते यांनी न बोलता सांगितले आहे.त्याचे आजचे कर्तव्य हे हृदयस्पर्शी असून माणूसकीचा संदेश देणारे आहे..

 

    यावेळी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,कीर्ती मासुरकर, नवेगांव येथील अनेक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News