पारशिवनी :-तालुका तिल ग्राम पंचायत पालासावळी येथे आज सांयकाळी कालभैरव देवस्थान – पेठ येथे ग्रामस्थांसह विकास कार्या संबंधी चर्चा करून देवस्थानाची समस्या जाणून घेतली. नंतर यादव यांनी आश्वस्त केले की लवकरच देवस्थानपरिसर विकासा करिता आवश्यक निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करणार.
देवस्थान परिसरात बेकायदेशीर कार्य करीत असणाऱ्या असामाजिकतत्वांच्या लोकांवर शासन प्रशासना कडून कायदेशीर कार्यवाही करून घेणार याबाबत उपस्थितांना हमी दिली.
यावेळी पाळासावळी चे सरपंच श्री राजेंद्र ठाकुर,श्री शालिक ढोंगे,श्री रामभाऊ ठाकुर,श्री फजीत कोरडे,श्री पतिराम पिलारे,श्री गिरधारी ढोगे, श्री संतोष कोरडे, श्री माणिक राऊत, श्री पुसाराम उकेपैठे, रणवीर यादव, अमित सिंग, सानू शेख, अतुल दानव यांचेसह कालभैरव देवस्थान पंच कमेटी कालभैरव परसोडी (पेठ), अध्यक्ष श्री नितेश ढोंगे,उपाध्यक्ष आसाराम उकेपैठे, सचिव अश्विन भरणे, सहसचिव निकेश बगमारे, कोषाध्यक्ष पंकज पिलारे, सहसर्व सदस्य , ग्राम पंचायत सदस्य तथा गावकरी व शेतकरी मोठी संख्येत उपस्थित होते.