पिंपरी बुद्रुक येथील मशान भूमीच्या घाटावर काटेरी कुंपणचे साम्राज्य… — पित्रे पक्षाला नैवेद्य देण्यासाठी जात असताना ग्रामस्थांना करावी लागते तारेवरची कसरत…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         पिंपरी बुद्रुकच्या मशान भूमीवरील घाटावर काटेरी कुंपण असल्यामुळे पितृ पक्षाला नैवेद्य देण्यासाठी जात आसताना नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत.

          पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील मशान भूमीच्या घाटावर गेल्या आनेक दिवसापासून काटेरी कुंपण आल्याने त्या घाटावरून नदी पात्रा कडे पितृ पक्षाला नैवेद्य देण्यासाठी ये जा करण्यास अनेक ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

             दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेले पिंपरी बुद्रुक गाव असुन यातील जानकर सर्वच लोकांना पित्रे पंधरवड्यात घाटावरील काटेरी कुंपण मुळे गैरसोय होत आहे.

          सदर पिंपरी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन मशान भुमीच्या घाटावरील काटेरी कुंपण काढण्यात यावे अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे. गावामधील आथवा परिसरातील एखादी व्यक्ती जर निधन झाल्यास अंत्यविधीला जाण्यासाठी पण अडचणीशी सामना करावा लागत असल्याने सदर ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन ग्राम पंचायतीने मशान भूमीच्या घाटावर असणारे काटेरी कुंपण काढण्यात यावे. अशी या परिसरातील व गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.