रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
बहुजन समाज पार्टी विधानसभा चिमूर व्दारा आज दिनांक 20 सप्टेंबर ला चिमूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला बहुजन समाज पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शिरिजकुमार गोगुलवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
इतर प्रमुख मान्यवर मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा प्रभारी राजेंद्र रामटेके व जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साठे,जिल्हा महासचिव सुभाष पेटकर, जिल्हा बामसेफ संयोजक महेंद्र मकेश्वर यांची उपस्थिती होती.
मेळाव्याचे प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष महेंद्र बारसागडे यांनी केले.विधानसभा प्रभारी धर्मदासजी गेडाम,विधानसभा प्रभारी नीलकंठ जांभुळे,विधानसभा महासचिव विनोदजी राऊत,विधानसभा B V F संयोजक दिगंबर गणवीर,चिमूर सेक्टर उपाध्यक्ष प्रशांत देठे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरपार सेक्टर अध्यक्ष निकेतन गेडाम यांनी केले.मेळाव्यामध्ये पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तळोधी येथील अशीश नगराळे,नांदगाव जानी येथील शेंडे,कोलारा येथील मदन गेडाम यांनी प्रबोधन पर गीते सादर केली.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व विधानसभा पदाधिकारी,सेक्टर पदाधिकारी,बूथ पदाधिकारी व पक्षाचे हितचिंतक,निष्ठावान कर्मठ कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले.